मुंबई

Mumbai Crime News : शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणुक फसवणूक

Share Market Fraud News – 11 लाख 80 308 रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश

मिरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील वसई परीसरात राहणा-या , शाह यांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळविण्याचे आमिष आर्थिक फसवणुक झाली होती. सदर फसवणुकीच्या अनुषंगाने सायबर पोलीस ठाणे येथे तक्रारी अर्ज प्राप्त करण्यात आलेला होता, तसेच माणिकपुर पोलीस ठाणे गु.रजी नं ०७/२०२४ भादविस कलम ४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Mumbai Crime News

(सायबर गुन्हे कक्ष आवक अर्ज क्रमांक ३७-बी/२०२३ दि. ०५/०१/२०२४)

नमूद तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळ्या बैंक खात्यात वळती झाल्याचे विसुन आले. त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बैंक सोबत पत्रव्यवहार करन संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली, त्यानंतर मा, न्यायालयाकडून तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरीता सायबर पोलीस ठाणेचे अधिकारी अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तक्रारदार यांची फसवणुक झालेल्या रक्कमेपैकी 11 लाख 80 हजार 308 रक्कम त्यांचे खात्यावर परत मिळविण्यात आली आहे. Mumbai Crime News

अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी

Telegram Channel, facebook, Instagram अथवा Watsapp वर जास्त परतावा देणा-या Promotional Adds वर विश्वास ठेवु नका. याद्वारे आपली आर्थिक फसवणुक होण्याची शक्यता आहे. अश्या प्रकारच्या फसवणुकीमध्ये Telegram Channel, Watsapp Group वर ॲड करुन तेथे इतरांना कसा फायदा होत आहे याचे Sceenshot, Massages दाखवुन पैसे गुंतवणुक करण्यास प्रवृत केले जाते. गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी सेचीची बनावट प्रमाणपत्रे दाखवुन फसवणुक करण्यात येते.
एकदा गुंतवणुकदारांचा विश्वास जिंकला की, हे लोक गुंतवणुकदारांना जास्त व खात्रिशिर परताच्याची हमी‌ देतात.

गुंतवणुकीमध्ये आर्थिक फसवणुक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. Share Market, Forex Trading, Crypto Investment, Mutual Funds मधील गुंतवणुक

करण्याअगोदर आपल्या वितीय सल्लागारासोबत चर्चा करुनच गुंतवणूक करा. कोणतेही अनाधिकृत ॲप्लीकेशन डाऊनलोड करु नये अथवा अनोळखी लिंकवर क्लिक करुन नये.

ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते

फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोचत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार पावी.

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), अमोल मांडवे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील याव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, अमिना पठाण, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, पोलीस शिपाई कुणाल सावळे, पोलीस हवालदार माथुरी थिडे, आकाश बोरसे, राजेश भरकडे यांनी पार पाडली आहे. Mumbai Crime News

सायबर फसवणूक हेल्पलाईन क्रमांक :1930सायबर फसवणुक हेल्पलाईन वेबसाईट www.cybercrime.gov.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0