मुख्य मजकुराकडे जा

Pune Crime: फुरसुंगी येथे विमा पॉलिसीच्या बहाण्याने ४० लाखांची ऑनलाईन फसवणूक

Pune crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : लाईफ इन्शुरन्स कंपनीचा एजंट असल्याचे भासवून एका व्यक्तीची ४० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

फुरसुंगी येथे विमा पॉलिसीच्या बहाण्याने ४० लाखांची ऑनलाईन फसवणूक
फुरसुंगी येथे विमा पॉलिसीच्या बहाण्याने ४० लाखांची ऑनलाईन फसवणूक

Pune crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : लाईफ इन्शुरन्स कंपनीचा एजंट असल्याचे भासवून एका व्यक्तीची ४० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फुरसुंगी परिसरात घडलेल्या या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फुरसुंगी गावातील रहिवासी असलेल्या ४६ वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फसवणुकीचा प्रकार डिसेंबर २०२५ ते ३० जून २०२६ या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला. अनोळखी मोबाईलधारकाने फिर्यादीशी संपर्क साधून आपण 'जनरेली इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनी लि.' या कंपनीचा एजंट बोलत असल्याचे सांगितले.https://maharashtramirror.com/ Pune crime

आरोपीने फिर्यादीचा पूर्ण विश्वास संपादन केला आणि विम्याचा प्रीमियम भरण्याच्या नावाखाली विविध खात्यांवर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. आरोपीच्या सांगण्यावरून फिर्यादी यांनी वेळोवेळी पैसे पाठवले, मात्र ही रक्कम कोणतीही पॉलिसी न काढता आरोपीने स्वतःकडे वर्ग करून घेतली. अशा प्रकारे भामट्याने फिर्यादीची एकूण ४० लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केली.https://maharashtramirror.com/ Pune crime

संशय आल्यानंतर फिर्यादी यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारक आणि संबंधित बँक खातेदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व आयटी अॅक्टच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) खांडे करत आहेत. https://maharashtramirror.com/ Pune crime

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper