क्राईम न्यूजपुणे

Pune Crime News | घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास बेड्या : वानवडी तपास पथकाची कामगिरी

  • 6 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | Pune Crime News

पुणे, दि. २७ मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News

वानवडी हद्दीत तीन घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला वानवडी तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. यावेळी तब्बल ३ गुन्ह्यांची उकल झाली असून ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ -५ आर. राजा DCP R. Raja, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग गणेश इंगळे ACP Ganesh Ingale, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पतंगे Sr.Pi. Sanjay Patange, निरिक्षक गुन्हे राजेंद्र करणकोट, व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे PSI Santosh Sonvane यांनी सदर कामगिरी केली आहे. Pune Crime News

याप्रकरणी संशयित आरोपी रेयान ऊर्फ फहिम फैयाज शेख, वय २१ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ३०३, निहाल हाईटस, सना बेकरी, भाग्योदयनगर, कोंढवा, पुणे याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दिनांक ११ फेब्रुवारी रोजी नीलकंठ अपार्टमेंट, फ्लॅट नंबर २०१, दुसरा मजला, पटांगण, वानवडी, पुणे येथून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा कि.रु. २,३३,५५०/- रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना तपासादरम्यान सीसीटिव्ही मध्ये दिसणारा संशयीत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रेयान ऊर्फ फहिम फैयाज शेख, वय २१ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ३०३, निहाल हाईटस, सना बेकरी, भाग्योदयनगर, कोंढवा, पुणे असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पतंगे यांनी आदेश देताच तपास पथक प्रभारी संतोष सोनवणे व पथकाने संशयित फहिम फैयाज शेख यास ताब्यात घेवून त्यास अटक केली.

आरोपी रेयान ऊर्फ फहिम फैयाज शेख याचेकडे अधिक तपास करता त्याने वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत आणखीन दोन ठिकाणी चोरी केल्याचे उघडकीस आले. आरोपीकडून ३ गुन्हयातील चोरी केलेला एकूण ६,७९,२५०/- रु. किं.चा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक संतोष सोनावणे करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार Pune Police CP Amitesh Kumar, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परि.-५. पुणे शहर आर राजा, व सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पतंगे, पोलीस निरिक्षक गुन्हे राजेंद्र करणकोट व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, हरिदास कदम, अमजद पठाण, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, यतिन भोसले, अमोल गायकवाड, गोपाल मदने यांनी केली आहे.

Sion Road Over-Bridge : सायन ओव्हर ब्रिज तोडण्यासाठी वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0