Mumbai Crime News | ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश, २५२ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त.. कोठे झाली कारवाई ?
•मुंबईत ड्रग्जच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सांगलीत पोलिसांनी सुमारे 100 किलो ‘मेफेड्रोन’ (अमली पदार्थ) जप्त केले आहे. Mumbai Crime News
मुंबई :- Mumbai Crime News | मुंबई पोलिसांनी सांगली जिल्ह्यात एका ‘ड्रग्ज फॅक्टरी’चा पर्दाफाश केला असून सुमारे 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 122 किलो ‘मेफेड्रोन’ (अंमली पदार्थ) जप्त केले आहेत. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, गुप्त माहितीच्या आधारे, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी संध्याकाळी छापा टाकला आणि इरळी गावात एका ड्रग मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा पर्दाफाश केला.हे युनिट एका शेतात होते, जिथून पोलिसांनी 100 किलो पेक्षा जास्त ‘मेफेड्रोन’ जप्त केले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 252कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. Mumbai Crime News
गुन्ह्याचा तपास चालु असताना आरोपींकडे व साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीवरून तांत्रिक तपासाव्दारे तसेच पोलीस पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी पाळत ठेवुन एम.डी. हा अंमली पदार्थ बनविणान्या कारखान्याचा शोध घेऊन दिनांक 25 मार्च 2024 रोजी सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाल पोलीस ठाणे हद्दीत इरळी या गावात धडक कारवाई करून एकुण 122.500 कि.ग्रॅ. वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ (अंदाजे 245 कोटी), तसेच एम.डी. बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व वाहन ताब्यात घेतले. सदर कारवाईमध्ये एकुण 06 पुरुष आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत आहे.
कामगिरी कक्ष-7, गु.प्र.शा., गु.अ.वि., घाटकोपर, मुंबई चे पोलीस पथकाने गोपनिय माहिती तसेच अविरत मेहनत करून तांत्रिक तपासाच्या आधारे अंमली पदार्थाची तरकरी करणारी टोळी तसेच अंमली पदार्थ बनविण्याचा कारखाना उध्वस्त करून धडक कारवाई केलेली आहे.
पोलीस पथक
Mumbai Police पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशी कुमार मिना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे,पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-1) विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व), चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष-7, गु.प्र.शा., गु.अ.वि., घाटकोपर, मुंबई चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे, पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, महिला पोलीस निरीक्षक बाळगी, पोलीस निरीक्षक उबाळे, पोलीस निरीक्षक शिंदे (कक्ष-१), पोलीस उपनिरीक्षक रामदास कदम, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल काळे, पोलीस उपनिरीक्षक शेलार, पोलीस उपनिरीक्षक परबळकर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी (कक्ष-5), सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजदार (कक्षा-4), सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम (अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी), पोलीस उपनिरीक्षक रहाणे (कक्ष-6), पोलीस उपनिरीक्षक तावडे (कक्ष-1) तसेच कक्ष-7 चे महिला सहाय्यक फौजदार धुमाळ,नाईक, सहाय्यक फौजदार सावंत, उबाळे, पोलीस हवालदार पवार, गुरव,शिंदे,बडगुजर,मोरे,कांबळे, बल्लाळ, जोशी,शेख, शिरापुरी, पांडे, गलांडे, जाधव, भोई, महिला पोलीस हवालदार तिरोडकर, पोलीस नाईक राऊत, पोलीस शिपाई शिंदे,सय्यद,होनमाने,सावंत,पाटील, महिला पोलीस शिपाई शेख,जाधव, धुमाळ, पोलीस हवालदार कदम, पोलीस शिपाई राठोड, पोलीस हवालदार बने, सावंत (कक्ष-12) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.