क्राईम न्यूज

Pune Crime News | माथेफिरूकडून चंदनगर येथे एकाचा खून तर हडपसर येथे दुसऱ्यावर जीवघेणा हल्ला : पुणे हादरले

  • हडपसर पोलीसांकडून आरोपीस बेड्या

पुणे, दि. 3 मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर)

पुण्यात एका माथेफिरूने एकाच दिवशी एकाचा खून करून दुसऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. खूनी माथेफिरू आरोपीस हडपसर पोलीसांनी होळकरवाडी परिसरातून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपी शुभम काकासाहेब निचळ, वय २७ वर्ष, रा. समर्थ बैठक हॉल समोर, होळकरवाडी असे अटक करण्यात आलेल्या माथेफिरूचे नाव आहे.

माथेफिरूने केलेल्या हल्ल्यात बाळु कांबळे याचा खून झाला असून राहुल काळे हा गंभीर जखमी झाला आहे.

दि. 1 मार्च रोजी रात्रौ 8 वाजताचे सुमारास जखमी राहुल काळे, वय ३९ वर्ष, रा. मगरपट्टा हडपसर यांना आरोपी नामे शुभम निचळ याने जुन्या वादाच्या कारणावरून धारधार शस्त्राने गळ्यावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने त्याबाबत हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ३८७/२०२४ भा.द.वि. कलम ३०७,३२६ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्यातील पाहीजे आरोपीचा शोध घेण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या सुचनांवरून हडपसर पोलीस स्टेशन तपास पथक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, अमोल दणके असे मिळुन आरोपींचा शोध घेत असताना, मिळालेल्या बातमीचे आधारे आरोपी शुभम काकासाहेब निचळ, वय २७ वर्ष, रा. समर्थ बैठक हॉल समोर, होळकरवाडी, पुणे यास हांडेवाडी परिसरातुन ताब्यात घेण्यात आले.

आरोपीस ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास करीत असताना त्याने सुरवातील उडवाउडवीची उत्तरे दिली, त्याचेकडे कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता, त्याने हडपसर पोलीस ठाणे येथील वरिल नमुद गुन्ह्यासह काल दिनांक ०१.०३.२०२४ रोजी दुपारच्या सुमारास रिव्हरडेल सोसायटी जवळ, खराडी येथे त्याच्या ओळखीच्या इसम बाळु कांबळे यास धारदार शस्त्राने मारून खुन केलेला असल्याचे सांगीतले. आरोपीने सांगीतलेल्या माहीतीवरून चंदननगर पोलीस स्टेशन येथून माहीती घेतली असता सदरबाबत चंदननगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १०६/२०२४ भा.दं. वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद असल्याचे व त्यातील संशयीताच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये नमुद आरोपी दिसत असल्याचे समजले.

आरोपी निचळ याला काही दिवसांपूर्वी कांबळे व त्याच्या साथीदारांनी जबर मारहाण केली होती. मारहाण झाल्याने निचळ हा रागाने बदला घेण्यासाठी फिरत होता. तर लहानपनी झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी राहुल काळे याच्यावर माथेफिरूने हल्ला केल्याचे वपोनि संतोष पांढरे यांनी महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी यांना सांगितले.

सदरची कामगिरी अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व आर राजा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली अश्विनी राख, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, पंडीत रेजितवाड, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, सचिन गोरखे, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0