मुंबई
Trending

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

Amit Shah Maharashtra Visit : 4 मार्च आणि 5 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावर असून त्यादरम्यान ते अकोला आणि जळगाव येथे देखील दौरा करणार आहे.

मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यामध्ये ते छत्रपती संभाजी नगर, जळगाव, अकोला येथे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चार आणि पाच मार्चला ते विविध बैठका घेणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि महायुतीमध्ये जागावाटप यासारख्या तिढा सोडवणार आहे.

भारतीय जनता पक्षाच्या BJP वतीने देशभरातील 150 लोकसभा‌ मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली‌ आहे. यानंतर पुढच्या टप्प्यातील उमेदवारांची यादी देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.अमित शहा हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्या दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वी देखील त्यांचा दौरा तसेच सभे नियोजन करण्यात आले होते. मात्र, दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा अचानक रद्द करण्यात आला होता. आता 4 आणि 5 मार्च रोजी अमित शहा हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार आहेत. तसेच या दरम्यान ते अकोला आणि जळगाव येथे देखील दौरा करणार आहेत. या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार अमित शहा हे करणार असल्याचे बोलले जात आहे. Amit Shah Maharashtra Visit

महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश या पहिल्या यादीत करण्यात आलेला‌ नाही. या सर्व पार्श्वभूमीवर पुढील यादीत महाराष्ट्रातील काही उमेदवार जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या‌ दृष्टीने महायुतीतील जागा वाटपाचा अंतिम निर्णय अमित शहा Amit Shah यांच्या उपस्थित होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्हादौरा

सोमवारी 4 रोजी रात्री 10 वा. 10 मि. नी. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व हॉटेल राम इंटरनॅशनल कडे रवाना व मुक्काम. मंगळवार दि.5 रोजी सकाळी सव्वा दहा वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने अकोलाकडे रवाना. अकोला व जळगाव येथील नियोजित कार्यक्रम आटोपून सायं. 5 वा. 40 मि. नी छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे हेलिकॉप्टरने आगमन व हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आगमन व राखीव. सायं. 6 वा. 10 मि. नी. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथून मोटारीने क्रांती चौक कडे प्रयाण, क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण, तेथून मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान, खडकेश्वरकडे प्रयाण, सायं. 6 वा. 35 मि. नी जाहीर सभेस उपस्थिती व संबोधन. सायंकाळी साडेसात वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावरुन मोटारीने छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण, सायंकाळी पावणे आठ वाजता विमानाने मुंबईकडे रवाना. Amit Shah Maharashtra Visit

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0