मुंबई

Mumbai Tadipar News : काशिमिरा पोलीस ठाणे हद्दीतील दोन सराईत गुन्हेगार हद्दपार

Mumbai Crime News : मधुकर पांडे, पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांची कारवाई, दोन्ही आरोपींवर दहाहून अधिक दखलपात्र अदखलपात्र गुन्हे

भाईंदर :- काशिमिरा पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आरोपी नामे विशाल रमेश राजभर (20 वर्षे) याच्या विरोधात मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय तसेच गुजरात राज्यातील वलसाड येथे जबरी चोरी, चोरी, फसवणूक व दुखापतीचे असे दखलपात्र 18 व अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. Mumbai Tadipar News

तसेच काशिमिरा पोलीस ठाणे हददीत राहणारा सराईत गुन्हेगार आरोपी नामे मनोज भुजारत चव्हाण (38 वर्षे), यांच्या विरोधात देखील काशिमिरा पोलीस ठाणे येथे मालमत्ता व शरीराविरुध्दचे असे एकूण 10 दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. Mumbai Tadipar News

दोन्ही आरोपी यांचेविरुध्द प्रतिबंधक कारवाई करून देखील त्यांचे वर्तनात सुधारणा न होता ते वारंवार गुन्हे करीत असल्याने व त्याचे बद्दल जनतेच्या मनात असुरक्षीततेची भावना निर्माण झाल्याने त्यांना काशिमिरा पोलीस ठाणे व आजुबाजूचे परिसरातून हददपार करणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने सदर आरोपी यांचावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम-56 (1) (अ) (ब) अन्वये हददपारीची कारवाई करणे आवश्यक होते त्याबाबतचा अहवाल पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-01, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांना पाठविण्यात आला होता. त्यानुसार पोलीस उप- आयुक्त, परिमंडळ-01, मिरारोड-पुर्व यांनी आरोपी 1) विशाल रमेश राजभर (20 वर्षे) यास 26 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्हयातून 2 वर्षाकरीता हददपार करण्यात आलेले आहे. तसेच आरोपी 2) मनोज भुजारत चव्हाण (28 वर्षे) यास 29 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्हयातून 2 वर्षाकरीता हददपार करण्यात आलेले आहे. Mumbai Tadipar News

पोलीस पथक

मधुकर पांडे पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त यांचा मार्गदर्शनाखाली प्रकाश गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-01, विजयकुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग, पोलीस निरीक्षक कुमारगौरव धादवड, सध्या नेम-पेल्हार पोलीस ठाणे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय मांडोळे, पोलीस हवालदार मधुकर सावंत, सचिन पाटील, पोलीस शिपाई प्रदिप काटकर, प्रविण टोबरे, रवींद्र कांबळे यांनी कामकाज केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0