Pune Crime News | थरारक पाठलाग… सराईत गुन्हेगार चिंग्या अखेर जेरबंद : वपोनि शैलेश संखे यांची धडाकेबाज कारवाई
- खंडणी विरोधी पथक १ कडून सराईत गुन्हेगाराचा थरारक पाठलाग | Pune Crime News
पुणे, दि. १ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी
Pune Crime News | गोळीबार प्रकरणात फरारी असणारा सराईत गुन्हेगार ‘चिंग्या’ उर्फ मयूर वाघमारे याला थरारक पाठलाग करत गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ कडून जेरबंद करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सपोआ गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-१ वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे Police Inspector Shailesh Sankhe व पथकाकडून सदर साहसी कामगिरी करण्यात आली आहे.
सराईत आरोपी मयुर ऊर्फ चिंग्या दिगंबर वाघमारे वय २२ वर्ष, रा.सर्वे न.४ लेन नं १ काकडे नगर, कोंढवा बु.पुणे असे अटक आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कोंढवा येथील गोळीबार प्रकरणी चिंग्या उर्फ मयूर वाघमारे पोलिसांना गुंगारा देत होता. खंडणी विरोधी पथक 1 कडील पोलीस हवालदार 7886 विजय कांबळे व पोलीस शिपाई 8193 पवार यांना फरार आरोपी ‘चिंग्या’ बाबत गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या बातमीवरून वपोनि शैलेश संखे यांनी पथकाला कारवाईसाठी सूचना दिल्या.
आरोपी मयुर ऊर्फ चिंग्या दिगंबर वाघमारे हा आपले अस्तित्व, नाव व पत्ता बदलुन मांजरी बुद्रूक येथिल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली होती. बातमीवरून खंडणी विरोधी पथक-१ कडून मांजरी बुद्रूक येथिल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी सापळा रचला असता आरोपी चिंग्याला पोलीस आल्याची चाहूल लागली. तो पोलीस पथकाला पाहून पळून जाऊ लागला. रात्रीच्या आंधरात् थरारक पाठलाग करून चिंग्याला जेरबंद करण्यात आले. पुढील तपासकामी कोंढवा पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपी विरुद्ध वानवडी पोलिस् स्टेशन येतील गु.र.नं ४२०/२०२४भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १०९,३(५)आर्म ॲक्ट ३(२५), २७, ३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ गुन्हा दाखल आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर निखिल पिंगळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, गणेश इंगळे, सहायक पोलीस गुन्हे 1, गुन्हे, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक 1, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक, शैलेश संखे यांचे सूचनेप्रमाणे सपोनि अभिजित पाटील, पो हवा 7886 विजय कांबळे, पो हवा 1135 नितीन कांबळे, मपोहवा 6010 गीतांजली जांभुळकर, पोहवा 6714 दुर्योधन गुरव, पोना 6574 चव्हाण, पोशी 8193 अमर पवार यांनी केली आहे.