पुणेमहाराष्ट्र

Vijay Shivtare Resigned : विजय शिवतारे शिवसेनेचा राजीनामा देणार?, विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात वाक्युध्द

Vijay Shivtare Resigned From Shivasena : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे लवकरच बंड करण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अजित पवार आणि शिवदारे यांच्या शाब्दिक चकमक होत आहे.

पुणे :- बारामती विधानसभेच्या Baramati Lok Sabha Election 2024 मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे शिंदे गटाचे विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात वाक्युध्द चालू असल्याचे दिसत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत. जनतेची अजित पवार यांना मतदान करण्याची इच्छा नाही. त्यामुळे महायुतीत एखाद्या उमेदवाराला एवढा विरोध होत असेल, तर आम्ही या प्रकरणी योग्य निर्णय घेऊ. गरज भासली तर आम्ही शिवसेनेचाही राजीनामा देऊ, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतील वाक्युद्ध अधिकच पेटण्याची भीती निर्माण झाली आहे.

लोकसभेच्या बारामती मतदार संघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. पण शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी त्यांच्या नाकीनऊ आणलेत. अजित पवार यांनी बुधवारी शिवतारेंच्या आरेला कारेने प्रत्युत्तर देण्याची भाषा केली. त्यानंतर शिवतारे यांनी गुरुवारी त्यांच्यावर पलटवार करताना जनतेची अजित पवारांना मतदान करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले.

शिवसेनेचाही राजीनामा देऊ

सध्या विजय शिवतारे तांत्रिक बोलत आहे. मी त्यांच्यासारखे आरेला कारेही करत नाही. पण अजित पवारांनी माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावे. जनतेची अजित पवारांना मतदान करण्याची अजिबात इच्छा नाही. महायुतीतील घटकपक्षांनी महायुतीचा धर्म जरूर पाळावा. पण महायुतीत एखाद्या उमेदवाराला एवढा विरोध होत असेल तर आम्ही या प्रकरणी योग्य तो निर्णय घेऊ. गरज भासली तर आम्ही शिवसेनेचाही राजीनामा देऊ. आमचे सर्वच कार्यकर्ते सध्या या मानसिकतेत आहेत, असा इशाराही विजय शिवतारे यांनी यावेळी बोलताना दिला.

काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना विजय शिवतारेंवर जोरदार हल्ला चढवला होता. ते म्हणाले होते की, विजय शिवतारे यांच्या उमेदवारीचे मला माहिती नाही. मी हा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातला आहे. आता वरिष्ठांचे ऐकायचे नाही किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हाला वातावरण खराब करायचे नाही. पण आम्हालाही आरेला कारे करता येते, असे ते म्हणाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0