क्राईम न्यूज

Pimpri Chinchawad Crime News | बँकॉक येथून ऑपरेट होतेय शेयर मार्केट फसवणूक : १०० कोटी गुंतवणुकीचा काळाबाजार पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून उघडकीस

पुणे/पिंपरी, दि. २४ मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pimpri Chinchawad Crime News | Share market fraud operating from Bangkok: Black market of 100 crore investment revealed by Pimpri Chinchwad Crime Branch

शेयर मार्केट गुंतवणुकीच्या निमित्ताने शेकडो कोटींची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून करण्यात आला आहे. बँकॉक येथून ऑपरेट होणारा फसवणुकीचा प्रकार पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने उघडकीस आणल्याने पुण्यासह पिंपरी चिंचवड येथील अनेक गुंतवणूकदारांना न्याय मिळणार आहे. सदर कामगिरी संदिप डोईफोडे पोलीस उपआयुक्त, गुन्हे पिंपरी चिंचवड, विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि वैभव शिंगारे यांनी केली आहे.

IBKR, Cresset Acadamy, Goldman Sachs या व्हॅटसअप ग्रुपचा वापर करुन फिर्यादी यांचे कोटयावधी रुपयाची फसवणुक करत असल्याने IBKR Securities, Cresset Acadamy, Goldman Sachs या कंपनीविरुध्द एकुण १०६९५७५/- रु आर्थिक फसवणुक केलेबाबत तक्रारदार यांनी वाकड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ३०६/२०२४ भा.द.वि. कलम ४१९, ४२० आय.टी. अॅक्ट ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हयाची व्याप्ती खुप मोठ्या प्रमाणावर असल्याने पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक, सायबर सेल, गुन्हे शाखा यांच्याकडे वर्ग करण्याचे आदेशित केले होते. सदर गुन्हयात आतापर्यंत ०४ आरोपी अटक करण्यात आले आहेत.

https://www.instagram.com/reel/C445LdCpqF1/?igsh=MXdtNDh0Z2htOHRjdw==

सदर गुन्हयाचा अधिक तपास केला असता यातील आरोपी हे फसवणुकीच्या पैश्यातुन गुजरात येथिल सोनाराच्या दुकानातुन सोने घरेदी करत असल्याची माहीती सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी यांना माहिती मिळाली होती. सदर माहीतीच्या अनुषंगाने व फिर्यादी यांनी आरोपीच्या अकाऊंटला भरलेल्या पैसे यांचे तांत्रिक विश्लेषण करुन गुजरात येथुन आरोपी नामे अमित जगदिशचंद्र सोनी यास ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने सांगीतले की तो सोन्याचे व्यापारी यांच्याकडुन सोने घेऊन त्याचे कॅश मध्ये रुपांतर करुन अहमद नजीर गाझी याला देत होता. अहमद नजीर गाझी हा ती कॅश मुफ्दल व त्याचा भाऊ नामे आबिद याला यु.एस.डी.टी. मध्ये क्रिप्टोकरन्सी खरेदी करुन पाठवत होता. आरोपी अहमद याचा सख्खा भाऊ आबिद व मुफ्दल हा बँकॉक

मध्ये राहुन तेथिल आंतराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीसोबत काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीने अद्यापर्यंत ६ अकाऊंटमधील पैसे काढुन कॅश त्याचे यु.एस.डी.टी मध्ये बँकॉक ला पाठविल्याचे उघडकीस आले. आरोपीच्या एकुण ६ अकाऊंटविरुध्द भारतामध्ये एकुण १७७ तक्रारी अर्ज प्राप्त झाले असुन १०० कोटीपेक्षा जास्त रकमेची फसवणुक झालेली आहे.

सदरची कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, संदिप डोईफोडे पोलीस उपआयुक्त, गुन्हे पिंपरी चिंचवड, विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि वैभव शिंगारे, सपोनि सागर पानमंद, सपोनि प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन, पोशि २५६३ अतुल लोखंडे, पोशि २५६२ बिचेवार पोशि २३०० कृष्णा गवळी, पोशि ३५३६ रजनिश तारु (सर्व नेमणुक सायबर सेल) यांच्या पथकाने केली आहे.

Yerwada Jail News | प्रतीक्षा संपली ! येरवडा कारागृह येथे कैद्यांच्या नातेवाइकांसाठी ‘प्रतिक्षालय’ : ADG अमिताभ गुप्ता यांची संकल्पना

Pune Crime News | कोंढव्यात गुंडावर एमपीडीए कारवाई

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्र मिरर व्हाट्स अप चॅनेल सबस्क्राईब करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0