Pune Alert | पालकांनो सावधान ! अल्पवयीनकडून गुन्हा झाल्यास पालकांवर गुन्हा दाखल होणार !
Pune Alert | पर्वती पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल
पुणे, दि. २१ मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Alert |
पुण्यात फोफावलेली अल्पवयीन गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune Police CP Amitesh Kumar यांनी मोठे पाऊल उचलले आहे. अल्पवयीन गुन्हेगारांचा उच्छाद आटोक्यात आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून आता थेट पालकांना जबाबदार धरून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन तोडफोड प्रकरणी ९ अल्पवयीन मुलांच्या पालकांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Pune Alert |
दांडेकर पुलाजवळ नव महाराष्ट्र भागात दुचाकीवरुन येऊन काही मोटार सायकलची तोडफोड केल्याची घटना सोमवारी (दि.18) घडली होती. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात आयपीसी 427, 34, 143, 147, 148, 149 सह मोटार वाहतूक कायदा, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस काद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासात हा गुन्हा 9 अल्पवयीन मुलांनी केल्याचे निष्पन्न झाले होते.
सदर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांना हत्यार देणारा होणार भावेश चव्हाण (रा. रविवार पेठ, पुणे) यास अटक करण्यात आली आहे. यावेळी अल्पवयीन मुलांना दुचाकी दिल्यावरून संबंधित पालकांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अल्पवयीन मुलांनी तोडफोड केल्यास त्यांना गुन्ह्यासाठी मदतकरणाऱ्यांवर तसेच मुलांच्या पालकांवर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिला आहे.
– SR. PI. Nandkumar Gaikwad
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 संभाजी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार, पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, अनिस तांबोळी, सुर्या जाधव, दयानंद तेलंगे-पाटील, सद्दाम शेख, अमोल दबडे, अमित चिव्हे, पुरुषोत्तम गुन्ला, अक्षय खन्ना यांच्या पथकाने केली.
Rohit Pawar Tweet : रोहित पवार यांचा ट्विट, म्हातारा पैलवान कुस्ती खेळताना चा व्हिडिओ केला ट्विट