Nitin Kodawate in BJP : काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, हे नेते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत
•काँग्रेसला एकापाठोपाठ एक मोठा फटका बसत आहे. आज मुंबईत काँग्रेस नेते डॉ.नितीन कोडवते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
काँग्रेसचे माजी नेते नितीन कोडवते आणि त्यांच्या पत्नी चंदा कोडवते यांनी महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातील गडचिरोली येथील काँग्रेस नेते डॉ.नितीन कोडवते आणि त्यांच्या पत्नी चंदा कोडवते यांनी आज पक्ष सोडला. नितीन कोडवते हे नक्षलग्रस्त गडचिरोलीतील प्रसिद्ध नाव आहे. 2019 ची विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. या दोघांचे भाजप कार्यालयात महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपमध्ये स्वागत केले.
बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेक्ष
डॉ नितीन कोडवते यांचा काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात करणार प्रवेश करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती त्यांचा भाजप प्रवेश होत आहे. गुरुवारीच काँग्रेसने महाराष्ट्रातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघात उमेदवारी मिळावी, यासाठी नितीन कोडवते स्पर्धेत होते. परंतु या ठिकाणी काँग्रेसने उमेदवार जाहीर केला नाही.
सात जागांवर सोलापूरमधून प्रणिती शिंदे, कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती, पुणे लोकसभा मतदार संघातून आमदार रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून गोवाल पाडवी, अमरावतीमधून वळवंत वानखेडे, लातूरमधून डॉ. शिवाजी कलगे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. परंतु काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय युवा नेते डॉ. नितीन कोडवते यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी भाजप प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.
नितीन कोडवते होते इच्छूक
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या वाढली आहे. 9 इच्छुकांनी मुलाखती देण्याचा सोपस्कार पार पाडला होता. त्यानंतर माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ.नामदेव किरसान, तसेच डॉ. नितीन कोडवते या तिघांमध्ये स्पर्धा होती. नितीन कोडवते यांच्या पत्नी चंदा कोडवते २०१९साली काँग्रेसच्या विधानसभेच्या उमेदवार होत्या. तसेच नितीन कोडवतेंकडे होती. काँग्रेस प्रदेश सचिवची जबाबदारी होती. परंतु तिकीट न मिळाल्यामुळे नाराज होऊन ते भाजपत गेल्याची चर्चा आहे.