महाराष्ट्र

Arvind Kejriwal Arrest : अरविंद केजरीवाल यांना अटकेनंतर महाराष्ट्रातील आमदारांनी दिल्या प्रतिक्रिया

Maharashtra MLA React On Arvind kejriwal Arrest : दिल्लीचे मुख्यमंत्री आमचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील आमदारांनी खोचक प्रतिक्रिया दिल्या

मुंबई :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून अटकेनंतर संपूर्ण देशात आप कार्यकर्त्यांनी निदर्शने चालू केले आहे. आप हा इंडिया आघाडीचा एक घटक पक्ष असून आता इंडिया गाडीतले महाराष्ट्रातील आमदारही अरविंद केजरीवाल यांच्या साथीला उभी आहे. शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी लोकशाहीची हत्या असल्याचे सांगत विरोधकांवर चांगलाच निशाणा धरला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी अरविंद केजरीवाल यांच्यानंतर त्यांना समर्थक ट्विट केले आहे.

आदित्य ठाकरे यांचे ट्विट

लोकशाहीपासून संपूर्ण व्यवस्थेची “de-mockery” पर्यंत…

विरोधी आघाडीतील 1 विद्यमान मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले, आणखी एका विद्यमान मुख्यमंत्र्यांनी अटक होण्यापूर्वी पदभार सोपवण्यासाठी राजीनामा दिला.

विरोधी पक्षाची खाती गोठवली.

अगदी महिनाभरापूर्वी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठीही कॅमेऱ्यात कॅमेऱ्यात कैद झालेली भयंकर गडबड निवडणूक प्रक्रिया.

राजकीय विरोध निर्लज्जपणे सरकारी एजन्सींच्या माध्यमातून विकत घेतला जातो किंवा तोडला जातो.

यापुढे आपण स्वतंत्र आणि निष्पक्ष लोकशाही आहोत हे जगासमोर खोटे बोलायचे आहे का?

आमदार जितेंद्र आव्हाड काय म्हणाले


निवडणुकीच्या तोंडावर एका केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्याला अटक करणे,ही भाजपची हुकूमशाही मानसिकता दाखवणारी कृती आहे.विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे प्रधानमंत्री मोदी आणि भाजपा पार्टी बिथरले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करून 400 पारचा नारा देणाऱ्या पार्टीला देशातील जनतेचे लक्ष electrol bond वरून हटवायचे आहे,असच प्रतीत होत आहे.

आमदार रोहित पवार यांनी “लडेंगे और जितेंगे “अरविंद केजरीवाल यांना समर्थन दिले

दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंद केजरीवाल यांची अटक ही अहंकाराचा कहर आहे…. आज ही परिस्थिती असेल तर चुकून २०२४ ला भाजप सत्तेत आली तर संविधान आणि लोकशाही हे सर्वांना विसरावं लागेल…
या काळात मा. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत महाराष्ट्राचीही स्वाभिमानी मराठी जनता आहे…
या कारवाईवरुन मात्र एक स्पष्ट झालं की, भाजप घाबरलीय!.

लडेंगेऔर जितेंगे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0