मुंबई

Prashant Thakur : ‘युवा पर्यावरण संसद’चे आयोजन; आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन

पनवेल : पनवेल महानगर पालिका आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने ‘युवा पर्यावरण संसद’चे आयोजन आज (दि. १३) करण्यात आले होते. खारघर येथे झालेल्या या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर Prashant Thakur यांनी भेट देऊन विधानसभा कामकाजाबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. सकारात्मक चर्चेला महत्व असल्याचे त्यांनी सांगून समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य सर्वांनी बजावले पाहिजे, असे प्रतिपादन केले.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवारी आंतर ‘महाविद्यालयीन पर्यावरण युवा संसद संपन्न झाली. या संसदेत के. एल. ई कॉलेज, पिल्लेज कॉलेज, रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅप्स सायन्स, एस. के कॉलजे नेरुळ आणि रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहाभा घेतला होता. यात विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक गंभीर समस्यांवर चर्चा करून उपाययोजना सुचविल्या. या संसदेत जलसंधारण, प्रदुषण नियंत्रण, हरित उर्जा, जंगलतोड आणि कचरा व्यवस्थापन या महत्वाच्या मुद्यांवर चर्चासत्र झाले. विद्यार्थ्यांनी विविध पर्यावरणीय समस्यांवर आधारित आपली मते मांडली आणि शाश्वत पर्यावरणासाठी उपयुक्त ठरणारे प्रस्ताव सादर केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेचे संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, संस्थेचे संचालक संजय भगत, स्कूल कमिटी मेंबर प्रभाकर जोशी, पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे, विद्यालयाच्या प्राचार्या निशा नायर, अयुफ अकुला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0
01:42