मुंबई

Congress Candidate List : काँग्रेसने महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावे केली जाहीर

Maharashtra’s Congress 7 Lok Sabha Candidates List छत्रपती शाहू महाराज काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढणार काँग्रेस कडून उमेदवारी जाहीर

मुंबई :- केंद्रीय काँग्रेस कमिटी कडून लोकसभेच्या उमेदवाराची तिसरी यादी गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील सात उमेदवाराची नावे घोषित करण्यात आली आहे. छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसने उमेदवारी देऊन आता छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काल दुपारीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्यांनी सांगितले होते की छत्रपती शाहू महाराजांना मोठ्या पदाधिक्याने भाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडून आणू आणि त्यांचे विजयाची सभा येथे घेऊ असे त्यांनी जाहीर केले होते.प्रामुख्याने कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू महाराज छत्रपती, सोलापूरमधून आमदार प्रणिती शिंदे, पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून ॲड. गोवाल पाडवी, लातूरमधून डॉ. शिवाजी कालगे, नांदेडमधून वसंत चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. Congress Candidate List

मतदारसंघ अन् उमेदवाराचे नाव

  • सोलापूर – प्रणिती शिंदे
  • कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती
  • पुणे – रवींद्र धंगेकर
  • नंदुरबार – गोवाल पाडवी
  • अमरावती – वळवंत वानखेडे
  • लातूर – डॉ. शिवाजी कलगे
  • नांदेड – वसंतराव चव्हाण

कोल्हापूरची लढत व्यक्तिगत नव्हे वैचारिक कोल्हापूरची लढत ही व्यक्तिगत नसून ती वैचारिक आहे. हिंदुत्ववादी विरुद्ध पुरोगामी अशी ही लढत होणार असून त्याचा संदेश राज्यभर जाणार आहे. म्हणूनच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवर राज्यसह देशाचे लक्ष राहणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार म्हणून शाहू महाराज छत्रपती यांचे नाव चर्चेत आले. Congress Candidate List

सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण वर्गाचा हिंदुत्वाकडे ओढा वाढला आहे. अशातच पारंपारिक शाहू विचारांच्या मतदारांना एकत्र करण्याचे काम शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीवरून होणार आहे. शिवाय शिंदे गट, राष्ट्रवादीतील गटातील अनेक पारंपरिक कार्यकर्त्यांना शाहू महाराज यांच्या विषयी आदर आहे. ती मतं मिळवण्यासाठी शाहू महाराज यांच्या सक्षम उमेदवाराचा चेहरा काँग्रेसकडून पुढे करण्यात आला आहे. Congress Candidate List

कोण आहेत नांदेडचे वसंतराव चव्हाण?

नांदेडमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आलेले वसंतराव चव्हाण हे पूर्वीच्या बिलोली व आताच्या नायगाव मतदारसंघातील प्रमुख नेते आहेत. ते आणि त्यांचे घराणे पूर्वी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते. ‘राष्ट्रवादी’ने त्यांना 2002 साली विधान परिषदेवर नियुक्त केले, पण 2009 मध्ये पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे ते बंडखोरी करून विजयी झाले. तेव्हापासून त्यांची राजकीय नाळ काँग्रेसशी जुळली. नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. 2014 साली दुसऱ्यांदा विजयी झालेल्या चव्हाण यांचा 2019 मध्ये भाजपाकडून पराभव झाला. चव्हाण अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर नायगाव मतदारसंघातील राजकीय स्थितीचा विचार करून वसंतरावांनी काँग्रेस पक्षातच थांबण्याचा निर्णय घेतला. Congress Candidate List

कोण आहेत प्रणिती शिंदे?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या अशी प्रणिती शिंदे यांची ओळख. पण प्रणिती शिंदे या वयाच्या 28व्या वर्षीच आमदार झाल्या. 2009 मध्ये त्यांनी सोलापुरातून पहिली निवडणूक लढवली. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी 33 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. सलग तीन वेळा त्या विधानसभेवर निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असतानाही त्या निवडून आल्या हे विशेष. Congress Candidate List

काँग्रेसचे कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर 2023 मध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करत विजयी झाले. माजी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठेतील जागा रिक्त झाली होती. कसबा पेठ भाजपचा बालेकिल्ला असून रवींद्र धंगेकर यांनी कसबापेठ पोटनिवडणुकीत बाजी मारली. Congress Candidate List

नंदुरबार लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून माजी मंत्री के सी पाडवी याचे पुत्र गोवाल पाडवी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नंदुरबारमध्ये आता वकील विरुद्ध डॉक्टर असा सामना होणार आहे. कारण गोवाल पाडवी हे पेशानं वकील आहेत. तर भाजपच्या उमेदवार हिना गावित या डॉक्टर आहेत. त्यामुळे नंदुरबारमधील या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. गोवाल पाडवी वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार का? अशी चर्चाही या मतदारसंघात सुरु आहे. कारण, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केसी पाडवी यांना हिना गावित यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. Congress Candidate List

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0