Uncategorized

Mumbai Traffic Update : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठा बदल

14 th April Dadar Traffic Update : डॉ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी परिसरात वाहतुकी व्यवस्थेमध्ये मोठा बदल,समाधान पवार, पोलीस उप आयुक्त यांनी वाहतूक व्यवस्थेबद्दल करण्याचे दिलेले निर्देश

मुंबई. :- (14 एप्रिल ) रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात येणार असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठ्या प्रमाणात चैत्यभूमी, दादर येथे दर्शनाकरिता जमणार आहेत. या पार्श्वभुमीवर चैत्यभूमी व आसपासच्या परिसरात 13 ते 14 एप्रिल या कालावधीत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने वाहतुक व्यवस्थापनाबाबतचे बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

, जनतेस पोहचणारा धोका, अडथळा तसेच गैरसोय टाळण्याकरीता आणि तसे निर्देश समाधान पवार, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय व मध्य विभाग), वाहतूक, याद्वारे खालील प्रमाणे आदेश देत आहे.

13 एप्रिल रोजी दुपारी 11.00 वा. पासून 14 एप्रिल रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत चैत्यभुमी, शिवाजीपार्क, दादर परिसराकडे जाणाऱ्या खालील रस्त्यांवरील वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करण्यात येणार आहे.

एक दिशा मार्ग व वाहतूकीसाठी बंद रस्ते

अ. एस. के. बोले रोड हा सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगिज चर्च पर्यंत एक दिशा मार्ग राहिल. म्हणजेच‌ पोर्तुगिज चर्च येथून एस. के. बोले रोडवर सिध्दीविनायकच्या दिशेने प्रवेश बंद राहिल.

ब. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग हा सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून येस बँक पर्यंत वाहतुकीकरिता बंद राहिल. तथापी स्थानिक रहिवाशांची वाहने शिवाजी पार्क रोड नं.5 म्हणजे पांडुरंग नाईक मार्ग मार्गाने जाऊ शकतील.

क. रानडे रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता बंद करण्यात येईल

ड.ज्ञानेश्वर मंदिर रोड, एस.व्ही.एस. रोड जंक्शन पासून दादर चौपाटीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद राहील.

इ. सर्व प्रकारची जड वाहने, माल वाहतुकीची वाहने माहिम जंक्शन येथून एल. जे. रोड मार्गे वळविण्यात येतील.

वाहतुकीची कोंडी झाल्यास पर्यायी मार्गाबाबत मार्गक्रमण सुचना

  • दक्षिण वाहीनी पश्चिम द्रुतगतीने बांद्रामार्गे दक्षिणेकडे जाणान्या वाहनांनी : कलानगर जंक्शनकडे येथून डावे वळण घेऊन धारावी टी जंक्शन ते सायन रेल्वे स्थानक किंवा ६० फुट रोड, कुंभारवाडामार्गे सायन रुग्णालय येथे उजवे वळण घेऊ शकतात. अथवा बांद्रा-वरळी सागरी उड्डाणपुल मार्गे (सी लिंक) दक्षिण मुंबईकडे प्रस्थान करावे.
  • उत्तर वाहीनी वरून कुलाबा तसेच सी.एस.एम.टी. मार्गे जाणाऱ्या वाहनांनी : डीमेलो रोड, बॅरीस्टर नाथ पै रोड, जकेरीया बंदर रोड, आर. ए. के. मार्ग यांचा वापर करून माटुंगा येथील अरोरा ब्रिजखाली उजवे वळण घेवून पुढे सायन हॉस्पीटल जंक्शन मार्गे पुढे मार्गक्रमण करावे. अथवा बांद्रा-वरळी सागरी उडडाणपूल मार्गे (सी लिंक) उत्तर मुंबईकडे प्रस्थान करावे.
  • उत्तर वाहीनी वरून महालक्ष्मी रेल्वे स्थानक जंक्शन कडून आणाऱ्या वाहनांनी : डॉ. ई. मोजेस रोड, रांगी चौक येथे उजवीकडे वळण घेवून सेनापती‌ बापट मार्गे पुढे मार्गक्रमण करावे.
  • पूर्व द्रुतगती महामार्गाने दक्षिणेकडे जाणारी वाहतुक : या वाहनांनी वडाळा ब्रिजचा वापर करुन बरकत अली नाका, बी.पी. टी. कॉलनी, पूर्व गुर्तगती मार्गाचा वापर करावा.

रस्त्यांवर दोन्ही बाजूस नो-पार्किंग
स्वातंत्रवीर सावरकर मार्ग,येस बँक जंक्शन
संपूर्ण रानडे रोड
केळूस्कर रोड दक्षिण व उत्तर
ज्ञानेश्वर मंदिर रोड

वाहने पार्क करण्यास उपलब्ध असलेले रस्ते.

  • संपूर्ण सेनापती बापट मार्ग, माहिम ते दादर
  • इंडिया बुल फायनांन्स सेंटर, एलफिन्स्टन, मुंबई (PPL)
  • कोहिनूर स्क्वेअर कंपाऊंड, शिवाजीपार्क, दादर (PPL)
  • कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग
  • इंडिया बुलस् सेंटर, ज्युपीटर मिल कंपाऊंड, एलफिन्स्टन (PPL)
  • पाच गार्डन, आर. ए. के.४ रोड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0