मुख्य मजकुराकडे जा

Mumbai News : मुंबई-नाशिक महामार्गावर दरोड्याचा थरार

Mumbai News : शहापूर - मुंबई- नाशिक महामार्गावरील खर्डी गावात दरोड्याचा थरार उघडकीस आला आहे.

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

Mumbai News : मुंबई-नाशिक महामार्गावर दरोड्याचा थरार

Mumbai News : शहापूर ठाण्यात गुन्हा दाखल, पाच अटकेत


Mumbai News : शहापूर - मुंबई-नाशिक महामार्गावरील खर्डी गावात दरोड्याचा थरार उघडकीस आला आहे. सुरतमधून व्यापाऱ्याची रोकड मुंबईला घेऊन जाणाऱ्या दोघांना मध्यरात्री रस्त्यात अडवून ६१ लाख ५० हजार रुपये लुटण्यात आले. यामध्ये दोघे पोलिसांच्या वेशात होते. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर या गुन्ह्यात आणखी सात ते आठ जणांचा समावेश असल्याने त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.https://maharashtramirror.com/ Mumbai News
तक्रारदार गोविंद हरगोविंदभाई पटेल (वय ४३, अलथान, जि. सुरत) हे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या के. पी. अंगाडीया कंपनीत वाहनचालक आहेत. ते २३ ऑगस्टला मालाडमधील एका कार्यालयात एक कोटी रुपयांची रोकड घेऊन साथीदार जिगरभाई पटेल यांच्यासोबत निघाले होते. खर्डी गावात मुंबई-नाशिक महामार्गावर तीन व्यक्तींनी वाहनाची काच ठोकून उघडण्यास सांगितले.https://maharashtramirror.com/ Mumbai News
क्राईम ब्रैचचे पोलिस असून तुमचे वाहन घेऊन पोलिस चौकीत चला, असे बोलून दरोडेखोर गाडीत घुसले. त्यांनी गाडीचा ताबा घेतला. गाडी मुंबईऐवजी नाशिककडे वळवली. तेथून पुन्हा गाडी मुंबईच्या दिशेने वळवून महामार्गावरील एका बंद हॉटेलजवळ थांबवून ६१ लाख ५० हजार रुपये घेऊन पोबारा केला. https://maharashtramirror.com/ Mumbai News

या प्रकरणात पाच जणांना अटक केली असून यामध्ये एक पोलिस कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यात एकूण सात ते आठ जणांचा समावेश असल्याची माहिती शहापूरचे उपविभागीय पोलिस अधीक्षक विशाल नागरगोजे यांनी दिली. तपासावर परिणाम होण्याच्या शक्यतेने गुन्हह्यात अटक केलेल्यांची नावे देण्यास त्यांनी नकार दिला, तर लुटीची रक्कम आणि इतर फरार आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास कदम यांनी दिली.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper