मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Devendra Fadnavis : "तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे!" — फडणवीसांची ठाकरेंना विधानभवनातच ऑफर

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : सभागृहात ऑफर, बाहेर मिश्कील भेट, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Devendra Fadnavis : "तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे!" — फडणवीसांची ठाकरेंना विधानभवनातच ऑफर

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : सभागृहात ऑफर, बाहेर मिश्कील भेट, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पावसाळी अधिवेशनात राजकीय फटाके फोडणाऱ्या अनेक घडामोडींमध्ये एक आगळा प्रसंग चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis On Uddhav Thackeray यांनी विधान परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट ऑफर दिली — "तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे!" या शब्दांनी.

या वक्तव्याने सभागृहातील वातावरण काही क्षणांसाठी रंगतदार झालं, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चेहऱ्यावरचे बदलते भाव साऱ्यांच्या नजरेत भरले. पुढे काय घडणार, यावरून राजकीय भाकितंही सुरू झाली.

आदित्य ठाकरेंची मिश्कील टीप — "तुम्ही ऑफर दिलीत म्हणून स्वागताला आलो"

याच संदर्भात संध्याकाळी देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरे यांची ओझरती भेट झाली. त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, "तुम्ही ऑफर दिलीत म्हणून स्वागताला उभा राहिलो आहे!" या वाक्यानंतर उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उसळला. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दानवेंच्या निरोपाला रंग, पण ‘स्कोप’मुळे चर्चा रंगात

या साऱ्या घडामोडींचा पार्श्वभूमी म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा शेवटचा दिवस. त्यांच्या निरोप समारंभात बोलताना फडणवीसांनी ठाकरेंना ही 'ऑफर' दिली. ते म्हणाले, "आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप 2029 पर्यंत नाही, पण तुम्हाला मात्र इकडे येण्याची शक्यता आहे."

या वाक्याने राजकीय भाकितांना नवे खाद्य मिळाले असून, शिवसेना शिंदे गट, भाजप आणि ठाकरे गट यांच्यातील संभाव्य समीकरणांबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

शेअर करा