मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Winter Session To Begin In Nagpur : पावसाळी अधिवेशन संपले; हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपुरात

• तारांकित प्रश्न, लक्षवेधी, विधेयक मंजुरी अशा कामकाजाचा तपशील जाहीर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Winter Session To Begin In Nagpur : पावसाळी अधिवेशन संपले; हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपुरात

•तारांकित प्रश्न, लक्षवेधी, विधेयक मंजुरी अशा कामकाजाचा तपशील जाहीर

मुंबई :— राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित झालं असून आगामी हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपूरमध्ये पार पडणार आहे. या पावसाळी अधिवेशनात विधानसभेपासून विधानपरिषदेपर्यंत मोठ्या प्रमाणावर कामकाज झालं, तसेच काही वेळ वाया देखील गेला, अशी माहिती उघड झाली आहे.

विधानसभा – मुद्देसूद कामकाज

विधानसभेच्या 15 बैठका पार पडल्या. यामध्ये एकूण 133 तास 4 मिनिटे कामकाज झाले. दररोज सरासरी 8 तास 55 मिनिटे कामकाज झाले. अधिवेशनात 579 तारांकित प्रश्न मंजूर झाले, परंतु फक्त 92 प्रश्नांवर चर्चा झाली.

या काळात 15 विधेयके मंजूर करण्यात आली, तर एक विधेयक मागे घेण्यात आलं. 7 अर्धातास चर्चा, तसेच 511 लक्षवेधी सूचना मंजूर, त्यापैकी 152 लक्षवेधींवर चर्चा झाली. अन्य कारणांमुळे 45 मिनिटांचा वेळ वाया गेला.
सदस्यांची उपस्थिती सरासरी 82.23 टक्के इतकी नोंदवली गेली.

विधानपरिषद – स्थैर्यपूर्ण चर्चा

विधानपरिषदेच्या देखील 15 बैठका झाल्या आणि एकूण 105 तास कामकाज झाले. दररोज सरासरी 7 तास कामकाज झालं. मंत्री अनुपस्थित असल्याने 1 तास 2 मिनिटे वेळ वाया गेला.

493 तारांकित प्रश्न स्वीकृत, त्यातील 81 प्रश्नांवर चर्चा झाली. तसेच 202 लक्षवेधी सूचना मंजूर, त्यापैकी 79 लक्षवेधींवर चर्चा करण्यात आली. विधानसभेत मंजूर झालेली 12 विधेयके विधानपरिषदेत संमत करण्यात आली.सदस्यांची उपस्थिती विधानपरिषदेच्या बाबतीत 84.53 टक्के इतकी नोंदली गेली.

हेही वाचा: Navi Mumbai Crime News : दुबईत नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; सिराज इद्रीस चौधरीला वाशी पोलिसांकडून अटक

शेअर करा