Water Crisis : नागरिकांच्या कराचे १६०० कोटी रुपये गेले 'पाण्यात'
पुणे, निलेश राऊत
2 मिनिट वाचन

Water Crisis : समान पाणीपुरवठा सोडाच, पण दिवसातून एकदाही पाणी नाही
पुणे, निलेश राऊत
water crisis: महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची "२४/७ समान पाणीपुरवठा योजना" फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरु झाली. या योजनेवर आजवर तब्बल १६०० कोटी रुपये खर्च करून झाले आहेत. मूळ कंत्राटाप्रमाणे या प्रकल्पाचं काम मार्च २०२२ मध्येच पूर्ण होणे अपेक्षित होते. पण अद्यापही केवळ ९० टक्के काम पूर्ण झाले असून, समान पाणीपुरवठा सोडाच, पण दिवसातून एकदाही पाणी नाही अशी स्थिती सध्या आहे. (water crisis pune 24-7 water supply scheme failed)

योजना अजूनही कागदावरच
याबाबत 'सजग नागरिक मंच'चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे पुण्यात ४०% पाणीगळती असल्याचे महापालिका सांगत आली आहे , ही पाणीगळती १५% पर्यंत कमी करुन नागरिकांना चोवीस तास समान पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून ही योजना सुरू करण्यात आली. पाईपलाईन आणि मीटर्स बसवण्यासंदर्भात कामाचा मूळ स्कोप २५% ने कमी करुनही व अनेकदा मुदतवाढ देऊनही आज रोजी ९० % काम जेमतेम पूर्ण झाले आहे. Water Crisis

PMC Water News : पुणेकरांच्या नशिबी अजून पंधरा दिवस गढूळच पाणी
एकीकडे जलसंपदा खाते पुण्यातील जादा पाणी वापरावर दंडात्मक बिल आकारणी करतेय आणि याला उत्तर म्हणून ज्या २४ तास समान पाणीपुरवठा योजनेकडे बोट दाखवलं जातं आहे ती मात्र वर्षानुवर्षे रेंगाळतेय हे अत्यंत खेदजनक आहे.
सर्वच राजकीय पक्षांची उदासीनता
पाणीगळती कमी करुन पुणेकरांना २४ तास समान पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने सुरू केलेली आणि पुणेकरांच्या करांचे १६०० कोटी रुपये खर्च झालेली ही योजना पूर्णत्वाकडे जात असताना आज पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येते आहे हे संतापजनक आहे. सर्वच राजकीय पक्षांनी गेली अनेक वर्षे पुणेकरांना समान पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते, ते सर्वजण आता मूग गिळून गप्प का बसले आहेत, हे समजत नाही. Water Crisis

PMC News : महापालिकेचे १० लाखांचे ‘फूड टेस्टिंग मशिन’ गायब; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
एवढा प्रचंड पैसा व वेळ खर्च करून सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे मूळ उद्दिष्ट (२४/७ समान पाणीपुरवठा) साध्य का होऊ शकले नाही, याचे उत्तर महापालिका आयुक्तांनी पुणेकरांना द्यावे, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.
"२४/७ समान पाणीपुरवठा योजना" फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरू
चोवीस तास समान पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट
योजनेवर १६०० कोटी रुपये खर्च
काही कामांची व्याप्ती २५% ने कमी केली गेली
अनेकदा मुदतवाढ; तरीही ९० टक्केच काम पूर्ण
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)




