मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Waqf Board Grant : शासनाचा निर्णय, वक्फ बोर्डाला 10 कोटी देण्याचे आदेश मागे

Waqf Board Grant Cancelled : वक्फ बोर्डाला निधी देण्याच्या आदेशाची चर्चा होऊ लागली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Waqf Board Grant : शासनाचा निर्णय, वक्फ बोर्डाला 10 कोटी देण्याचे आदेश मागे

Waqf Board Grant Cancelled : वक्फ बोर्डाला निधी देण्याच्या आदेशाची चर्चा होऊ लागली. त्यानंतर आता हा आदेशच मागे घेण्यात आला आहे.

मुंबई :- राज्य वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी 10 कोटी रुपये देण्याचे आदेश सरकारने मागे घेतले. Waqf Board Grant Cancelled मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी ही माहिती दिली. याबाबत महाराष्ट्र भाजपने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली असून यापूर्वीचा आदेश रद्द करण्यात आल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र भाजपने सोशल मीडियावर पोस्ट

वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याबद्दल प्रशासनाने काढलेला GR रद्द भाजपा-महायुती सरकारने महाराष्ट्र वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी दिल्याच्या खोट्या बातम्या प्रसिध्द होत आहेत. हा चुकीचा निर्णय प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी परस्पर घेतला होता. मात्र भाजप नेत्यांच्या तीव्र विरोधानंतर हा निर्णय आता रद्द करण्यात आला आहे.वक्फ बोर्डाला संविधानात स्थान नाही यावर भाजप ठाम आहे आणि राहणार. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शासन निर्णय मागे घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 28 नोव्हेंबरच्या शासन आदेशानुसार, महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी 2024-25 या कालावधीसाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी दोन कोटी रुपये छत्रपती संभाजी नगर येथील वक्फ बोर्डाच्या मुख्यालयाला देण्यात आले. वक्फ बोर्डाला पैसे देण्याचे आदेश निघाल्यावर शिवसेना-ठाकरे टोमणा मारला होता. यावरून त्यांचा ढोंगीपणा दिसून येतो, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या होत्या. टीकेदरम्यान, भाजपने स्पष्ट केले की हे प्रशासकीय त्रुटीमुळे घडले कारण सध्या राज्यात काळजीवाहू सरकार आहे जे असा कोणताही आदेश देऊ शकत नाही.

शेअर करा