मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

विवेक वाडेकर पुणे आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त

तीन दशकांहून अधिक सेवाकाळ

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

विवेक वाडेकर पुणे आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त

तीन दशकांहून अधिक सेवाकाळ

पुणे: विवेक वाडेकर (आयआरएस १९९१ तुकडी) यांनी पुणे येथील आयकर विभागाचे 'प्रधान मुख्य आयुक्त' म्हणून पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी वाडेकर हे पुणे येथे 'मुख्य आयकर आयुक्त' म्हणून काम पाहत होते.

वाडेकर यांनी तीन दशकांहून अधिक सेवाकाळात करप्रणाली, आर्थिक अंमलबजावणी, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरण यांसारख्या विविध क्षेत्रांतील गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक बाबी हाताळताना त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. याशिवाय, आर्थिक गुन्हे आणि बेकायदेशीर पैशांचे व्यवहार संदर्भातील दिल्ली येथील 'सक्तवसुली संचालनालय' मध्ये विशेष संचालक आणि 'आर्थिक गुप्तचर' विभागात अतिरिक्त संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे.

तसेच , त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयात आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयात उपसचिव, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयात संचालक, आयकर विभागाच्या 'दक्षता संचालनालय' मध्ये अतिरिक्त सहसंचालक, तर दिल्ली येथील मुख्य आयकर आयुक्त आणि प्रधान आयकर आयुक्त म्हणूनही सेवा बजावली आहे. विवेक वाडेकर यांच्या विविध पदांवरील नियुक्त्यांमुळे त्यांची कारकीर्द एका सामान्य महसूल अधिकाऱ्यांच्या पारंपरिक कामाच्या कक्षेपलीकडे विस्तारली आहे.

वाडेकर यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले. इतिहासातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून, त्यांनी पुणे विद्यापीठातून जर्मन भाषेचा पदविका अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.

शेअर करा