Virar Crime News : विरारमध्ये वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश; गुन्हे प्रकटीकरण शाखेने तिघांना ठोकल्या बेड्या
Virar Latest Bike Robbery News : मुंबई आणि पालघरमधील सराईत चोरांकडून 5 गुन्हे उघड; विरार पोलिसांची धडाकेबाज कारवाई
1 मिनिट वाचन

Virar Latest Bike Robbery News : मुंबई आणि पालघरमधील सराईत चोरांकडून 5 गुन्हे उघड; विरार पोलिसांची धडाकेबाज कारवाई
विरार :- विरार पोलीस ठाण्याच्या Virar Police Statiin हद्दीत दुचाकी आणि इतर वाहने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास आणि बातमीदारांच्या मदतीने 3 आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून वाहन चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत. Virar Latest Crime News
नेमकी घटना आणि तपास
विरार पोलीस ठाण्यात वाहन चोरीच्या संदर्भात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) आणि 3(5) अन्वये दोन वेगवेगळे गुन्हे आणि दाखल झाले होते. या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते.
गुन्हे प्रकटीकरण पथकाने
घटनास्थळाचा पंचनामा आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आरोपींचा मागोवा घेतला. सातत्यपूर्ण तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई आणि पालघर परिसरातून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेले आरोपी
1) विशाल विक्रम माने (26 वय): रा. मनोरी कोळीवाडा, मालाड, मुंबई.
2) सनी भाईलाल प्रजापती (27 वय): रा. सफाळे पश्चिम, जि. पालघर.
3) गौरव सुधीर साळवी (25 वय): रा. बोळींज, विरार पश्चिम.
तपासात मिळालेले यश
अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत विरार आणि आसपासच्या परिसरात केलेले वाहन चोरीचे एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत.
पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस उपायुक्त सुहास बावचे (परिमंडळ-3), सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल.एम. तुरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेश गायकवाड आणि सपोनि ज्ञानेश फडतरे यांच्या पथकाने केली. या पथकात पोउपनिरी ज्ञानेश्वर कोकाटे आणि इतर पोलीस अंमलदारांचा समावेश होता.




