मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Virar Crime News : शंभर गुन्हे नावावर असलेल्या अट्टल सोनसाखळी चोरांना विरारमध्ये बेड्या; बोळींज पोलिसांकडून 'मोक्का'अंतर्गत कारवाई

•'मेंटल' आणि 'बडा साजीद' पोलिसांच्या जाळ्यात; हेल्मेट आणि विना नंबरच्या दुचाकीचा वापर करून करायचे चोरी

V
Vivek

2 मिनिट वाचन

Virar Crime News : शंभर गुन्हे नावावर असलेल्या अट्टल सोनसाखळी चोरांना विरारमध्ये बेड्या; बोळींज पोलिसांकडून 'मोक्का'अंतर्गत कारवाई

•'मेंटल' आणि 'बडा साजीद' पोलिसांच्या जाळ्यात; हेल्मेट आणि विना नंबरच्या दुचाकीचा वापर करून करायचे चोरी

विरार (बोळींज) :- विरार पश्चिम येथील बोळींज परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने खेचून नेणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करण्यात बोळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मोठे यश आले आहे. या आरोपींच्या गुन्हेगारीचा आवाका आणि त्यांच्यावर असलेले 100 हून अधिक गुन्हे लक्षात घेता, पोलिसांनी त्यांच्यावर 'मोक्का' (MCOCA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली आहे.

नेमकी घटना काय?

19 जानेवारी 2026 रोजी रात्रीच्या सुमारास, तक्रारदार महिला आपल्या मुलीसह म्हाडा कॉलनी, बोळींज परिसरात चालत जात असताना ही घटना घडली होती. एका काळ्या रंगाच्या पल्सर 220 मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी महिलेच्या गळ्यातील 13 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (किंमत 57 हजार रुपये) जबरीने खेचली. या झटापटीत फिर्यादी महिलेच्या गळ्याला दुखापतही झाली होती.

तपासाचे चक्र आणि 'मेंटल'ची अटक

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

29 जानेवारी 2026 रोजी पोलिसांनी मालाडच्या अंबुजवाडी परिसरातून अतिफ मोबीन अन्सारी ऊर्फ मेंटल (वय 43) याला अटक केली.मेंटलच्या चौकशीतून त्याचा साथीदार साजीद अब्दुल अजीज शेख ऊर्फ बडा साजीद (राहणार वांद्रे पूर्व) याचे नाव समोर आले.

'बडा साजीद'चा सांताक्रुझमधून थरारक पाठलाग

आरोपी साजीद हा गुन्ह्यादरम्यान हेल्मेट आणि हुडी टोपीचा वापर करून स्वतःची ओळख लपवत असे. तसेच तो विना नंबरच्या दुचाकी वापरण्यात सराईत होता. मात्र, गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर बोळींज पोलिसांनी 10 मार्च 2026 रोजी त्याला सांताक्रुझ, मुंबई येथून ताब्यात घेतले.

मोक्का कारवाई आणि जप्ती

आरोपींवर मुंबई आणि आसपासच्या परिसरात सुमारे 100 जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या संघटित गुन्हेगारीची दखल घेत पोलिसांनी 27 फेब्रुवारी 2026 रोजी या गुन्ह्यात 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम' (मोक्का) ची कलमे वाढवली. पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेली सोन्याची चैन गुजरात राज्यातील नवसारी येथून हस्तगत केली आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतही त्यांनी अशाच प्रकारे सोनसाखळी चोरी केल्याचे उघड झाले आहे.

यशस्वी पोलीस पथक

ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त सुहास बावचे आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे, उपनिरीक्षक किरण वंजारी, विष्णू वाघमोडे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.

शेअर करा