मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vijay Shivtare : "माझा नेताच पलटूराम निघाला… विजय शिवतारे यांच्या नावाने सोशल मीडियावर पत्र व्हायरल

Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election : बारामती लोकसभा जागेवरून विजय शिवतारे यांनी बंड पुकारले आणि त्यानंतर त्यांचे बंड थंड झाले या सर्व घडामोडीनंतर विजय शिवतारे यांच्या नावे सोशल मीडियावर पत्र व्हायरल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vijay Shivtare

Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election : बारामती लोकसभा जागेवरून विजय शिवतारे यांनी बंड पुकारले आणि त्यानंतर त्यांचे बंड थंड झाले या सर्व घडामोडीनंतर विजय शिवतारे यांच्या नावे सोशल मीडियावर पत्र व्हायरल

पुणे :- विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधातील भूमिका मागे घेतली. त्यानंतर विजय शिवतारेंना काही प्रश्न विचारून आरोप पुरंदरचा तह झाला अन् माझा नेताच पलटूराम निघाला असे शिवतारेंवर आरोप करणारे पत्र काल, सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्या व्हायरल पत्रास आता विजय शिवतारे यांच्या कडवट शिवसैनिकाने प्रत्युत्तर दिले आहे. पत्र व्हायरल करणाऱ्यास शिवतारे यांचे समर्थक माणिक निंबाळकरांनी सडेतोड उत्तर दिले. ते पत्र देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

काय म्हणाले पत्रात, वाचा जसेच्या तसे…!

प्रिय बोगस शिवसैनिक मित्रा सप्रेम जय महाराष्ट्र !

तू बोगस पत्रप्रपंच केलास हे पत्रातल्या पहिल्या वाक्यातूनच पुरंदर हवेली मतदारसंघातील शिवसैनिकांनी ओळखलं होतं. शिवसैनिक कधीही स.न.वि.वि. वगैरे शब्दावलीने पारंपारीक पद्धतीचं पत्रलेखन करीत नाही. जय महाराष्ट्र हे आदरणीय बाळासाहेबांनी दिलेलं संबोधन त्याच्या कायम ओठावर असतं.निनावी पत्र लिहिण्यापेक्षा तो बिनधास्त स्वतःच्या नावाने पत्र लिहितो. त्यामुळे हा उपद्व्याप केवळ महायुतीला विरोधासाठीच केलेला असल्याने आम्ही त्याला गांभीर्याने घेत नाही. तसंही तू आधी सामान्य बारामतीकर म्हणून केलेला असाच निनावी पत्रव्यवहार आम्ही अजून विसरलो नाही.बाकी शिवतारे यांचा आवाका ज्यांना जाणून घ्यायचा होता त्यांना तो अगदी व्यवस्थित कळला आहे. तू खरंच शिवसैनिक असशील तर यापुढे उघडपणे स्वतःच्या नाव पत्त्यासह पत्र पाठव. शिवसैनिक असण्याचा आव आणण्यापेक्षा आपल्या तुतारीची पिपाणी होणार नाही याची काळजी घे. धन्यवाद. पुन्हा एकदा सप्रेम जय महाराष्ट्र ! तुझा, (माणिक निंबाळकर) मु. एखतपुर ता. पुरंदर जि. पुणे.

शेअर करा