मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vashi Bomb Threat: वाशीतल्या इन ऑर्बिट माॅलमध्ये बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल

Vashi Bomb Threat : पनवेलचा ओरियन मॉल केला केला खाली

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vashi Bomb Threat: वाशीतल्या इन ऑर्बिट माॅलमध्ये बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल

Vashi Bomb Threat : पनवेलचा ओरियन मॉल केला केला खाली

पनवेल : वाशी येथील इन ऑर्बिट माॅलमध्ये Vashi Inbor बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल आला आणि काही क्षणातच माॅल रिकामा करण्यात आला. या माॅलसह एकूण 26 माॅलची नावे या मेलमध्ये असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पनवेलच्या ओरायन माॅलला देखील रिकामा करण्यात आले. सध्या सर्व ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे.
वाशी येथील इन ऑर्बिट माॅलसह 25 माॅलमध्ये बाॅम्ब ठेवला असल्याचा धमकीचा मेल इन ऑर्बिट माॅलला आला होता.नवी मुंबईतील वाशी मधील इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. नवी मुंबई मधील वाशी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या इनॉर्बिट मॉल मध्ये बॉम्ब असल्याचा ई-मेल मॉल प्रशासनाला करण्यात आला आहे. हा मॉल सर्वात गजबजलेला मॉल समजला जातो. आणि याच नवी मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे.

मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा ई-मेल मिळताचा संपूर्ण मॉल खाली करण्यात आला आहे. बॉम्ब शोधक, नाशक पथक देखील घटनास्थळी दाखल झालं आहे. आता संपूर्ण मॉलची तपासणी करण्यात येत आहे.या मेलमध्ये पनवेलच्या ओरायन माॅलचेही नाव असल्याचे समजते आहे.म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या माॅलला जाऊन नागरिकांना माॅलमधून बाहेर जाण्याचे आवाहन केले.अचानक पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर नागरिकांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान पनवेलच्या ओरायन माॅलमध्येही पोलिस तपासणी करत आहेत.

हेही वाचा: Sex Racket Busted : स्पा’च्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या सिमरन दीदीवर कारवाई ?

शेअर करा