मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vasai News : कळंब समुद्रकिनारी रहस्यमय कंटेनर!

•वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर अचानक मोठा कंटेनर आढळल्याने खळबळ; पोलिसांचा तपास सुरू

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vasai News : कळंब समुद्रकिनारी रहस्यमय कंटेनर!

•वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर अचानक मोठा कंटेनर आढळल्याने खळबळ; पोलिसांचा तपास सुरू

वसई :- वसई पश्चिमेतील कळंब समुद्रकिनारी मंगळवारी सकाळी एक मोठा कंटेनर वाहून येताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रभात फेरीसाठी आलेल्या नागरिकांनी या कंटेनरवर पहिल्यांदा लक्ष दिलं आणि तत्काळ नालासोपारा पोलिसांना याबाबत माहिती दिली.

हा कंटेनर समुद्रकिनाऱ्यावर आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच, नागरिकांनी कळंब समुद्रकिनाऱ्याकडे मोठ्या प्रमाणावर धाव घेतली. कंटेनरचं रहस्य नेमकं काय आहे, याचा तपास सुरू झाला आहे.

पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, कंटेनर किनाऱ्यावरून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तो बंदिस्त अवस्थेत आढळून आल्यामुळे आत काय आहे याबाबत नागरिकांत उत्सुकता आणि भीती दोन्हीच आहे.

"हा कंटेनर एखाद्या मालवाहू जहाजातून पाण्यात पडला असावा," असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, तो मुद्दाम येथे सोडण्यात आला का, आत कुठले रसायन वा साहित्य आहे का, हे जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी बंदोबस्त वाढवला आहे.

कळंब समुद्रकिनारा हे पर्यटनासाठी लोकप्रिय स्थळ असून, समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षिततेबाबत या घटनेनंतर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलीस प्रशासन, नौदल आणि सीमाशुल्क यंत्रणा या प्रकरणाचा बारकाईने तपास करीत आहेत.

हेही वाचा: Mumbai Drugs News : मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई! सव्वासात कोटींच्या गांजासह चार आरोपी ताब्यात

शेअर करा