Vasai Crime News : ट्रान्सफार्मर मधून कॉपर आणि ऑइल चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले गजाआड
Vasai News Pelhar Police Arrested Transformer Wire Stoller : पेल्हार पोलीस ठाण्याचा गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी ; सराईत चोरी करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद
2 मिनिट वाचन

Vasai News Pelhar Police Arrested Transformer Wire Stoller : पेल्हार पोलीस ठाण्याचा गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी ; सराईत चोरी करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद
वसई :- वसईच्या सागर कंपाऊंड ,पेल्हार गाव येथे ट्रान्सफॉर्मर मधून कॉपर Transformer Wire Stoller आणि ऑइल चोरी झाल्याची घटना पेल्हार पोलीस ठाण्यात Pelhar Police Station तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी एका सराईत टोळीला अटक करून जेरबंद करण्यात आले आहे. गुन्हयात चोरी केलेल्या मालापैकी 380 किलो वजनाचे 3 लाख 80 रुपये किंमतीचे कॉपर Copper Stolen From Transformer पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत करण्यात आले आहे. प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. Vasai Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,असीम अरिफ नंदोलिया (41 वर्ष) सागर कंपाऊन्ड, पेल्हार गाव,वसई या ठिकाणी असलेल्या ट्रान्सफॉर्मर च्या बाजुला लावलेली लोखंडी जाळे कट करुन त्यावाटे आत प्रवेश करुन एकुण 6 लाख 99 हजार रुपये किंमतीचा ट्रॉन्सफॉर्मर मधील कॉपर व ऑईल असा मुद्देमाल चोरुन नेलेबाबत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेतात पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला घडलेल्या घटनेबाबत तपास करण्याच्या सूचना दिल्या. गुन्हे प्रकटीकरण विभागाने या टोळीचा शोध घेत असताना सीसीटीव्ही च्या मदतीने चार आरोपी लाल कारमधून आले असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेच्या मार्फत पेल्हार ते शिळफाटा असा पाठलाग करून आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी ठाणे आणि उत्तर प्रदेशातून आरोपींना ताब्यात घेतले आहे.तसेच चोरी केल्याबाबतची कबुली आरोपींनी दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेल्या मालापैकी 380 किलो वजनाचे तीन लाख 80 हजार रुपयांचे कॉपर पोलिसांनी हस्तगत केले आहे. आरोपींच्या विरोधात यापूर्वीही पेल्हार पोलीस ठाण्यात दोन तर अंबरनाथ पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. आरोपींनी कॉपर चोरीचे इतरत्र गुन्हे दाखल असून आरोपी यांनी अंबरनाथ, डोंबीवली, तळोजा, येथे देखील ट्रान्सफार्मरमधील तांबे व ऑईल चोरी केले असल्याचे तपासात सांगितले आहे. Vasai Crime News
पोलीस पथक
जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -3, विरार,बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे, कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), शकील शेख, पोलीस निरीक्षक (प्रशासन) पेल्हार पोलीस ठाणे, पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मीक पाटील, मिथुन मोहिते पोलीस अंमलदार रवि वानखेडे, निखील मंडलिक, किरण आव्हाड, राहूल कर्पे, दिलदार शेख, अभिजित नेवारे, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. Vasai Crime News
हेही वाचा: Fake Currency News : वाशिमच्या मंगरुळपीर येथील घटना ; बनावट नोटा छापणाऱ्या चौघांना अटक
हेही वाचा: Vasai Illegal Migrant : वसईमधून अवैध वास्तव्य करणार्या दोन बांगलादेशींना अटक
- #कुमारगौरव धादवड
- #Pelhar Police Station
- #CCTV footage
- #Jayant Bajbale
- #गुन्हे
- #Case filing
- #Yogesh Deshmukh
- #महाराष्ट्र
- #असीम अरिफ नंदोलिया
- #रवि वानखेडे
- #पोलिसांची कारवाई
- #शकील शेख
- #Oil
- #Abhijit Neware
- #Anil Sable
- #Sujay Patil
- #उत्तर प्रदेश
- #वाल्मीक पाटील
- #Vehicle chase
- #Anil Shegar
- #गुन्हा
- #Asim Arif Nandolia
- #मिथुन मोहिते
- #सीसीटीव्ही फुटेज
- #जयंत बजबळे
- #Kumar Gaurav Dhadavd
- #महाराष्ट्र
- #तुकाराम भोपळे
- #पोलीस पथक
- #Shakil Sheikh
- #arrest
- #तपास
- #पेल्हार पोलीस ठाणे
- #Police Action
- #राहूल कर्पे
- #Tukaram Bhopale
- #बजरंग देसाई
- #Uttar Pradesh
- #Transformer theft
- #investigation
- #Nikhil Mandlik
- #अभिजित नेवारे
- #Jitendra Wankhade
- #गुन्हा दाखल
- #Criminal gang
- #Vasai Crime News
- #Bajrang Desai
- #Transformer Wire Stoller
- #योगेश देशमुख
- #कॉपर
- #अनिल शेगर
- #ट्रान्सफार्मर चोरी
- #Diladar Sheikh
- #निखील मंडलिक
- #वाहनाचा पाठलाग
- #सोपान पाटील
- #Theft
- #Kiran Avhad
- #Valmik Patil
- #जितेंद्र वनकोटी
- #किरण आव्हाड
- #Police Team
- #अनिल साबळे
- #अटक
- #सराईत टोळी
- #Sharad Rathod
- #Sopaan Patil
- #Mithun Mohite
- #Tanaji Chavan
- #दिलदार शेख
- #Copper Stolen From Transformer
- #Rahul Karpe
- #चोरी
- #ऑईल
- #Copper
- #तानाजी चव्हाण
- #Ravi Wankhede
- #शरद राठोड




