मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vasai Crime News : वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेची‌ कामगिरी ; वाहन चोरी करणाऱ्या 3 आरोपींना अटक

आरोपींकडून 6 मोटार वाहन जप्त करुन 3 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश

V
Vivek

2 मिनिट वाचन

Vasai Crime News : वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेची‌ कामगिरी ; वाहन चोरी करणाऱ्या 3 आरोपींना अटक

आरोपींकडून 6 मोटार वाहन जप्त करुन 3 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश

वसई :- वालीव‌ गुन्हे प्रकटीकरण विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली असून तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे हे आरोपी सराईत वाहन चोर होते. पोलिसांना आरोपींकडून तीन मोटर वाहन जप्त करण्यास यश आले आहे. फिर्यादी अन्बर खुज्जादीन कुरुश यांचे नाईकपाडा, वसई पूर्व परीसरात "सलामत चिकन सेंटर" नावाचे दुकान आहे. दुकानाच्या बाहेर पार्क करुन ठेवलेली फिर्यादीची होंडा कंपनीची डिओ मोटार सायकल ही 9 मार्च ला अज्ञात चोरटयाने चोरी केली. सदरबाबत वालीव पोलीस ठाण्यात कलम 379 भा.दं.वि. या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी केलेली कारवाई

वसई-विरार परीसरात मोटार वाहन चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-2 यांनी वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत आदेश दिले. उमेश माने पाटील, सहाय्यक उप आयुक्त, तुळींज विभाग व जयराज रणवरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शन व सुचनांनुसार वालीव पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप व गुन्हे प्रकटीकरण पथकाने सि.सि.टी.व्ही. फुटेजच्या आधारे शोध मोहिम राबवून वसई पुर्वस्थित सातिवली वसई पुर्व परीसरातुन आरोपी नामे 1) रोहीत राजेश सिंग रा.अंबरनाथ पश्चिम 2) अनिल कपुर सिंग रा. अंबरनाथ 3) मोहन हरजीत सिंग,वसई पूर्व यांना ताब्यात घेण्यात आले. नमुद आरोपीतांकडे केलेल्या सखोल तपासात आरोपींकडून वसई, विरार व नालासोपारा परीसरातुन चोरी केलेल्या 5 मोटार सायकली आणि 1 ऑटो रिक्षा असे एकूण अंदाजे किंमत 3 लाख 60 हजार वाहने जप्त करुन एकुण 6 वाहन चोरीच्या गुन्हांची यशस्वी उकल करण्यात वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरणशाखेस यश आले.

पोलीस पथक

पौर्णीमा चौघुले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ 2 वसई, उमेश माने पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, वालीव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जिलानी सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, पोलीस अंमलदार विनायक राऊत, अभिजीत गहरी यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.

शेअर करा