मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vasai Crime News : ऑनलाइन फसवणूक ; वर्क फ्रॉम होम च्या नावाने फसवणूक, हॉटेल,मूव्ही रेटिंग गुंतवणुक फसवणूक

•युट्युब व्हिडिओ, लाईक स्टार, मूव्ही रेटींग वर्क फ्रॉम होम असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mira Road Credit Card Fraud News

•युट्युब व्हिडिओ, लाईक स्टार, मूव्ही रेटींग वर्क फ्रॉम होम असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक

वसई :- ऑनलाइन द्वारे फसवणूक होणाऱ्या घटना सातत्याने वाढत असताना मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील काशिगाव पोलीस ठाणे परिसरातील त्यागराज बांदेकर (48 वर्ष) यांना वर्क फ्रॉम होम च्या नावाने फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये बांदेकर यांना वर्क फ्रॉम होम च्या नावाने युट्युब व्हिडिओ,लाईक, स्टास्क ऑनलाइन हॉटेल नावाने आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. पाच लाखाहून अधिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली असून काशिगाव पोलिसांच्या सायबर विभागाने पाच लाखाहून आर्थिक रक्कम तक्रारदार यांना परत देण्यात यश आले आहे.

आर्थिक फसवणूक सायबर विभागाकडून आर्थिक रक्कम परत

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या आयुक्तालयातील काशिगाव पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या बांदेकर यांनी काशिगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून काशिमीरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या भादवी कलम 420,34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमन कलम 66 (सी),66 (डी), प्रमाणे गुन्हा दाखल करून सायबर विभागाने तक्रारदार यांच्या बँकेकडून आरोपीच्या खात्यात जी रक्कम वळवण्यात आली होती ते गोठवण्यास यश आले आहे. गोठवलेले रक्कम बँकेबरोबर पत्रव्यवहार करून ती परत देण्यास पोलिसांना यश आले. तसेच पोलिसांनी साक्षीदार त्यागराज बांदेकर यांच्या फसवणुकीतील आठ लाख पंधरा हजार रकमेपैकी पाच लाख पंचवीस हजार रक्कम खात्यावर बलात करण्यास यश आले आहे.

पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-02, मिरारोड, विजयकुमार मराठे, सहाय्यक, पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे.

हेही वाचा: Panvel Police News : पोलिसांनी विविध 38 गुन्ह्यातील लाखो रुपयाचा जप्त केलेला मुद्देमाल केला नष्ट !

शेअर करा