मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vasai Crime News : नायगाव पोलिसांची धडक कारवाई! मिरारोडच्या 'दुचाकी' चोरट्यांच्या टोळीला बेड्या; पाच मोटारसायकल जप्त

•हायवेवरील चोरीचा तपास करताना टोळी गजाआड | मिरारोड, उत्तण आणि दहिसरमधील गुन्ह्यांची कबुली | 2 लाख 85 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

V
Vivek

2 मिनिट वाचन

Vasai Crime News : नायगाव पोलिसांची धडक कारवाई! मिरारोडच्या 'दुचाकी' चोरट्यांच्या टोळीला बेड्या; पाच मोटारसायकल जप्त

•हायवेवरील चोरीचा तपास करताना टोळी गजाआड | मिरारोड, उत्तण आणि दहिसरमधील गुन्ह्यांची कबुली | 2 लाख 85 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

वसई :- मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उभ्या असलेल्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात नायगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मोठे यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नायगाव आणि आसपासच्या परिसरातून दुचाकी चोरीच्या तक्रारी वाढत होत्या. या गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास करत पोलिसांनी मिरारोड परिसरातून तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे.

नेमकी घटना काय?

नायगाव पूर्व येथील बापाणे परिसरात राहणारे आकाश लहाणे यांची पांढऱ्या रंगाची होंडा स्कूटी (क्र. MH-48 DB-7821) 18 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लांबवली होती. महामार्गावर वासमारे पुलाजवळून ही चोरी झाली होती. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात 'बीएनएस' कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

असा लागला चोरट्यांचा छडा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी दोन पथके तयार केली होती. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मिरारोड गाठले. तेथून पोलिसांनी खालील तीन आरोपींना ताब्यात घेतले.

1) मोसीन चुन्ने खान (वय 21, रा. मिरारोड)

2) शाहरुख मतीन खान (वय 20, रा. मिरारोड)

3) हसनेन गुलाम खान (वय 19, रा. मिरारोड)

पाच दुचाकी हस्तगत

पोलिसी खाक्या दाखवताच या तिघांनी मिरारोड, उत्तण आणि दहिसर (मुंबई) परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण 2.85 लाख रुपये किमतीच्या 5 मोटारसायकल जप्त केल्या आहेत, ज्यात:

दोन बजाज पल्सर (NS)

एक बजाज पल्सर (160)

एक ॲक्टिव्हा स्कूटी

एक ॲक्सेस स्कूटी

अटक करण्यात आलेल्या मोसीन खान याच्यावर मिरारोड पोलीस ठाण्यात यापूर्वीच एक गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.

या पथकाने बजावली कामगिरी

ही यशस्वी कामगिरी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त नवनाथ घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली.

हेही वाचा: Rohit Pawar : रोहित पवारांना 'सीएकओ'चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

शेअर करा