मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Varsha Gaikwad : काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांची अनुपस्थिती

•Varsha Gaikwad काँग्रेसची बैठक रद्द, आमदार वर्षा गायकवाड गैरहजर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Varsha Gaikwad

•Varsha Gaikwad काँग्रेसची बैठक रद्द, आमदार वर्षा गायकवाड गैरहजर

मुंबई - महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या कथित वादामुळे आज मुंबई काँग्रेसची बैठक रद्द करण्यात आली आहे. यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांच्या अनुपस्थितीचे कारण देण्यात आले आहे.

मविआच्या जागावाटपात मुंबईतील 6 पैकी केवळ 2 काँग्रेसच्या वाट्याला आल्यात. त्यात दक्षिण मध्य मुंबईची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वाट्याला गेली आहे. यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आळवला जात आहे. या प्रकरणी बुधवारी दुपारी मुंबई काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. पण वर्षा गायकवाड यांच्या गैरहजेरीमुळे ती ऐनवेळी रद्द करण्यात आली. आता ही बैठक उद्या गुरुवारी होणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: Bhiwandi Crime News : निजामपुरा पोलिसांची कामगिरी ; दरोडाच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना केले अटक

शेअर करा