मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vande Bharat Train : महाराष्ट्राला तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या!

Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान धावणार आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vande Bharat Train

Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मार्गावर ट्रेन सुरू केली आहे.

ANI :- महाराष्ट्राला पुन्हा एकदा नवीन वंदे भारत Vande Bharat Train एक्सप्रेस ट्रेनची भेट मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अहमदाबादहून व्हिडिओ लिंकद्वारे तीन नवीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला, त्यानंतर महाराष्ट्रात धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची संख्या आता 11 झाली आहे. या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

नवी ट्रेन नागपूर-सिकंदराबाद, कोल्हापूर-पुणे आणि पुणे-हुबळी या मार्गावर धावणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेकडून महाराष्ट्रात वेगवेगळ्या मार्गांवर 8 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवल्या जात होत्या.मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी, स्वप्नील नीला यांनी माहिती दिली की, तीनही नवीन मार्गावरील वंदे भारत ट्रेन ही सेमी-हाय स्पीड ट्रेनची प्रगत 2.0 आवृत्ती आहे.

पुणे-कोल्हापूर आणि पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला प्रत्येकी आठ डबे आहेत आणि ते आठवड्यातून तीन दिवस धावतील, तर 20 डब्यांची नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावेल. मध्य रेल्वेने सांगितले की, पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस सोमवारी पुण्याहून 16:15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी हुबळीला 23:40 वाजता पोहोचेल.नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस नागपूरहून दुपारी 4.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.25 वाजता सिकंदराबादला पोहोचेल.

आठवड्यातून तीन दिवस धावणाऱ्या कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रकही रेल्वेने जाहीर केले आहे.कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस १९ सप्टेंबरपासून दर गुरुवार, शनिवार आणि सोमवारी धावणार आहे. ते कोल्हापूरहून सकाळी 8.15 वाजता निघून त्याच दिवशी दुपारी 1:30 वाजता पुण्याला पोहोचेल. पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस 18 सप्टेंबरपासून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस १८ सप्टेंबरपासून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. पुण्याहून दुपारी 2.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 7.40 वाजता कोल्हापूरला पोहोचेल.

हेही वाचा: vijay wadettiwar : संजय गायकवाड यांच्या राहुल गांधींच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार संतापले

शेअर करा