मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात दोन आरोपी अटकेत

सुषमा अंधारे यांचा संताप; “राजकीय पाठबळामुळेच उशिरा अटकेची कारवाई” महिला आयोगाच्या निष्क्रियतेवर टीका; “सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये उशिरा का?” असा सवाल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात दोन आरोपी अटकेत

सुषमा अंधारे यांचा संताप; “राजकीय पाठबळामुळेच उशिरा अटकेची कारवाई” महिला आयोगाच्या निष्क्रियतेवर टीका; “सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये उशिरा का?” असा सवाल

पुणे :- वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात अखेर मोठी कारवाई करत पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पहाटे साडेचारच्या सुमारास अटक केली आहे. मात्र ही अटक पोलिसांनी केली की आरोपी स्वतःहून हजर झाले, याबाबत संभ्रम कायम असून यामुळे प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा संशय अधिकच गडद झाला आहे.

या कारवाईवर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर आणि महिला आयोगावर घणाघाती टीका केली. "जर आरोपी स्वतःहून हजर झाले असतील, तर त्यांना राजकीय पाठबळ आहे हे स्पष्ट होते," असे त्या म्हणाल्या. अटक होण्यापूर्वी आरोपी एका हॉटेलमध्ये जेवत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यामुळे पोलीस कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असे महिला आयोग सांगतोय, पण वैष्णवीचा मृत्यू पाच दिवसांपूर्वी झाला, तेव्हा सरकार गप्प का होते?” त्यांनी सरकारच्या विलंबित प्रतिसादावरही नाराजी व्यक्त केली.

तसेच, अंधारे यांनी नाशिकच्या येवला तालुक्यातील भक्ती अथर्व गुजराती या तरुणीच्या आत्महत्येचा संदर्भ देत सांगितले की, "सासरच्या जाचाला कंटाळून आणखी एक तरुणी जीव देते आणि आयोग अजूनही सुस्तच आहे. हा आयोग खरोखर महिलांसाठी काम करतोय का?"

या घडामोडींमुळे वैष्णवी हगवणे प्रकरण अधिकच गाजू लागले असून, राजकीय आणि सामाजिक स्तरावर संतापाची लाट पसरली आहे.

हेही वाचा: Navi Mumbai News : किरकोळ कारणावरून २ तरुणांना मारहाण, हल्लेखोर शोधात

शेअर करा