मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vaibhav Khedekar : 'मेरा पानी उतरता देख मेरे किनारे घर मत बसा लेना’; वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश पुन्हा रखडला, व्हॉट्सॲप स्टेटसची जोरदार चर्चा

•शक्तीप्रदर्शन करत मुंबईत दाखल, पण भाजप प्रवेशाची गाडी तिसऱ्यांदा वेटिंगवर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vaibhav Khedekar : 'मेरा पानी उतरता देख मेरे किनारे घर मत बसा लेना’; वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश पुन्हा रखडला, व्हॉट्सॲप स्टेटसची जोरदार चर्चा

•शक्तीप्रदर्शन करत मुंबईत दाखल, पण भाजप प्रवेशाची गाडी तिसऱ्यांदा वेटिंगवर

मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून (मनसे) बडतर्फ करण्यात आलेले कोकणातील नेते वैभव खेडेकर यांचा भाजपमधील प्रवेश पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. शेकडो समर्थकांसह गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईतील भाजप कार्यालयात दाखल झाल्यानंतरही त्यांना पक्षप्रवेश मिळाला नाही. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यामुळे नाराज झालेल्या खेडेकर यांचे 'मेरा पानी उतरता देख मेरे किनारे घर मत बसा लेना’ असे व्हॉट्सॲप स्टेटस सध्या जोरदार चर्चेत आले आहे, जो भाजपला एक प्रकारे इशारा असल्याचे मानले जात आहे.

दोनदा रखडला भाजप प्रवेश

मनसेतून बडतर्फ झाल्यानंतर वैभव खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. गणेशोत्सवादरम्यान त्यांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन हा निर्णय घेतला. त्यानुसार 4 सप्टेंबर रोजी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रवेश निश्चित झाला होता. मात्र, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे तो प्रवेश पुढे ढकलण्यात आला.

नियोजित वेळेनुसार मंगळवारी (23 सप्टेंबर) पुन्हा त्यांच्या पक्षप्रवेशाचे आयोजन करण्यात आले होते. खेडेकर यांनी रत्नागिरीतून 40 ते 50 गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईत शक्तीप्रदर्शन करत भाजप कार्यालयात दाखल झाले. मात्र, यावेळीही त्यांच्या पक्षप्रवेशाची गाडी थांबली. भाजपच्या कोणत्याच मोठ्या नेत्याने त्यांच्या प्रवेशाकडे लक्ष दिले नाही. यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत

सतत तिसऱ्यांदा पक्षप्रवेश रखडल्यानंतर वैभव खेडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले आहे. "मेरा पानी उतरता देख मेरे किनारे घर मत बसा लेना, मे समुंदर हू लौटकर जरूर आउंगा" या हिंदी वाक्यातून त्यांनी एक प्रकारे राजकीय पुनरागमनाचा इशारा दिला असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, भाजप नेत्यांनी खेडेकर यांच्या पक्षप्रवेशाकडे पाठ फिरवल्याने रत्नागिरी जिल्ह्यात हा विषय चर्चेचा बनला आहे. आता भाजप त्यांना कधी हिरवा कंदील दाखवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा: Jalna News : मंत्री महोदय, ‘जळतंय ते कळतंय’; जालन्यात कृषीमंत्र्यांच्या गाडीसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश, कुजलेली पिकं हातात देऊन विचारले जाब

शेअर करा