मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Uran News : कामगार नेते स्व. शाम म्हात्रे यांची पुण्यतिथि दिमाखात साजरी.

उरण : दिवंगत जेष्ठ नेते शाम पदाजी म्हात्रे यांचे सहावे पुण्यस्मरण ९ जून २०२४ रोजी खांदा कॉलनी येथील त्यांच्या निवास्थानी त्यांच्या कन्या कामगार नेत्या कु .

V
Vivek

1 मिनिट वाचन

Uran News : कामगार नेते स्व. शाम म्हात्रे यांची पुण्यतिथि दिमाखात साजरी.

उरण : दिवंगत जेष्ठ नेते शाम पदाजी म्हात्रे यांचे सहावे पुण्यस्मरण ९ जून २०२४ रोजी खांदा कॉलनी येथील त्यांच्या निवास्थानी त्यांच्या कन्या कामगार नेत्या कु . श्रुती शाम म्हात्रे यांनी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. स्व.शाम म्हात्रे यांच्या पुण्यतिथी निमित्त सकाळी आगरी शिक्षण संस्था शाळेत अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास कामगार नेत्या कू.श्रुती शाम म्हात्रे यांच्या हस्ते स्व. शाम म्हात्रे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्हार अर्पण करण्यात आला.त्यावेळी आगरी शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक पंकज भगत तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते.त्यानंतर त्यांच्या राहत्या घरी अभिवादनाच्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी हजेरी लावत स्व.शाम म्हात्रे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

स्व.शाम म्हात्रे यांच्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक बांधिलकितून त्यांची कन्या श्रुती म्हात्रे दरवर्षी विविध उपक्रम राबवित असतात ह्या वर्षी त्यांनी स्वामी समर्थ फाउंडेशन या संस्थेला सामाजिक बांधिलकी जाणिवेतून सढळ हस्ते रोख निधी स्वरूपात भेट देऊन आपल्या वडिलांच्या आठवणींना तेवत ठेवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे .त्यानंतर संध्याकाळी गणेश मंदीर तसेच व्यावसायीक विक्रेता संघ येथिल व्यापारी वर्गाने देखील अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.संध्याकाळी गणेश मंदिरात श्रुती म्हात्रे ह्यांच्या हस्ते गणेशाची आरती करून त्यानंतर पुण्यतिथी साजरी करण्यात आली

दिवंगत जेष्ठ नेते शाम म्हात्रे साहेब यांच्या पुणयतिथीनिमित्त विविध पक्षातील नेतेमंडळी , कार्यकर्ते, कोकण श्रमिक संघातील सर्व कामगार वर्ग तसेच रोज बाजारातील व्यापारी वर्ग आणि आगरी शिक्षण संस्थेतील समस्त परिवार हे या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित राहिले होते.

हेही वाचा: Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोड फेज-2 चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी अजित पवार यांचा कडून उद्घाटन

शेअर करा