मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची बंडखोरांवर कारवाई, या 5 बड्या नेत्यांवर निलंबनाची कारवाई

शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर नेते रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगुल, संजय आवारी आणि प्रसाद ठाकरे यांची पक्षविरोधी कारवायांसाठी हकालपट्टी केली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Uddhav Thackeray

शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर नेते रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगुल, संजय आवारी आणि प्रसाद ठाकरे यांची पक्षविरोधी कारवायांसाठी हकालपट्टी केली आहे.

मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बंडखोरांवर मोठी कारवाई केली आहे. बंडखोरांवर कारवाई करताना उद्धव ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवायांमुळे पाच नेत्यांची हकालपट्टी केली आहे.त्यात भिवंडीचे माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगुल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे यांचा समावेश आहे.

शिवसेनेचे भिवंडी लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रुपेश म्हात्रे यांची पक्षविरोधी कारवायांमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.रूपेश म्हात्रे यांनी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, परंतु पक्षविरोधी वक्तव्ये आणि कारवायांमुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली. मात्र, त्यावेळी त्यांनी अर्ज मागे घेतला होता.

याशिवाय वणी विधानसभा जिल्हाप्रमुख विश्वास नांदेक, झरी तालुकाप्रमुख चंद्रकांत घुगुल, मारेगाव तालुकाप्रमुख संजय आवारी, यवतमाळ जिल्हा वणी तालुकाप्रमुख प्रसाद ठाकरे यांचीही पक्षविरोधी कारवायांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे.

हेही वाचा: Salman Khan Threat News : 'सलमान खानला जिवंत रहायचे असेल तर…', लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पुन्हा धमकी

शेअर करा