मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Uddhav Thackeray On PM Modi : पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण 'त्या घोषणांची भूत त्यांच्या मानगुटीवर बसली आहेत'; उद्धव ठाकरेंचा टोला

•‘मोदी माझे दुश्मन नाहीत, पण ते जरी मला शत्रू मानत असले तरी…’; शिवसेना खतम करण्याच्या राजकारणावर टीका

V
Vivek

1 मिनिट वाचन

Uddhav Thackeray

•‘मोदी माझे दुश्मन नाहीत, पण ते जरी मला शत्रू मानत असले तरी…’; शिवसेना खतम करण्याच्या राजकारणावर टीका

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, यासोबतच त्यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपवर जोरदार टीकाही केली आहे. शिवसेना संपवण्याचे राजकारण कोणीही सहन करणार नाही, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

'मोदी माझे दुश्मन नाहीत'

मातोश्रीवर एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मोदी कोणी माझे दुश्मन नाहीत. मी त्यांना माझं दुश्मन मानत नाही. ते जरी मला शत्रू मानत असले, तरी मी त्यांना दुश्मन मानत नाही.” मात्र, यानंतर त्यांनी भाजपच्या राजकारणावर निशाणा साधला. “ते ज्या पद्धतीने शिवसेना खतम करायला निघाले आहेत, ते राजकारण कोणी सहन करू शकत नाही. मोदींच्या मनात पाप असले, तरी मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून चांगला कारभार व्हावा.”

'घोषणेची भूत मानगुटीवर'

पंतप्रधान मोदींच्या भूतकाळातील घोषणांचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टोला लगावला. ते म्हणाले, “भूतकाळात त्यांनी अनेक घोषणा केल्या होत्या. त्या घोषणांची भूत त्यांच्या मानगुटीवर बसली आहेत.” यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, स्मार्ट सिटी, 15 लाख खात्यात येणार, अच्छे दिन यांसारख्या घोषणांची आठवण करून दिली.

'शिंदे गटातील नगरसेवक परत येणार?'

यावेळी पत्रकारांनी त्यांना धाराशिवमधील शिंदे गटाचे काही माजी नगरसेवक परत येण्यास इच्छुक असल्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केले. "ते तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसेलच," असे म्हणत त्यांनी भविष्यात आणखी काही नेते आणि पदाधिकारी त्यांच्या गटात परत येण्याचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा: Meenatai Thackeray Statue : शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न

शेअर करा