मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : उत्सवाचे रूपांतर गोंगाटात होता कामा नये; उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

Mumbai News : मुंबई : गणेशोत्सव हा जनतेच्या आनंदासाठी असावा, त्रास देण्यासाठी नाही.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

उत्सवाचे रूपांतर गोंगाटात होता कामा नये; उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका
उत्सवाचे रूपांतर गोंगाटात होता कामा नये; उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

Mumbai News : मुंबई : गणेशोत्सव हा जनतेच्या आनंदासाठी असावा, त्रास देण्यासाठी नाही. त्यामुळे उत्सवाचे रूपांतर गोंगाटात होता कामा नये, अशी भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. मोठ्या आवाजातील डीजेऐवजी आरती, झांज आणि घंटानाद यांसारख्या पारंपरिक पद्धतीनेही उत्सव साजरा करता येतो, असे त्यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ mumbai News

डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर सरकारने संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकसमान धोरण जाहीर करावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली. ध्वनिप्रदूषणाची डेसिबल मर्यादा निश्चित असताना तिची अंमलबजावणी कोण करणार, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी. तसेच गणेशोत्सव मंडळांशी संवाद साधून वेळ, ध्वनीची मर्यादा आणि पारंपरिक वाद्यांच्या वापराबाबत मार्गदर्शन करावे, असे त्यांनी सुचवले.https://maharashtramirror.com/ mumbai News

दहीहंडीतील अश्लील नृत्यांवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. अशा प्रकारांना हिंदुत्व म्हणायचे का, असा सवाल करत राजकीय पक्षांनी मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन उत्सवांचे पावित्र्य जपावे, असे आवाहन त्यांनी केले.https://maharashtramirror.com/ Mumbai News

‘पेपरफुटी म्हणजे विद्यार्थ्यांचे भविष्य फोडणे’

एमपीएससीच्या कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरूनही ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. सरकारी नोकरीसाठी मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पेपर फुटणे म्हणजे त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होणे आहे. “आमदार फुटल्यानंतर सुरत, गुवाहाटीला जातात; मग पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी कुठे जायचे?” असा उपरोधिक सवाल त्यांनी केला. केवळ मंत्र्याचा राजीनामा घेऊन प्रश्न सुटणार नसून परीक्षा यंत्रणेत कायमस्वरूपी सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Mumbai News

पक्षाचे नाव, धनुष्यबाण आणि निवडणूक आयोगावर सवाल

शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी न्यायालयीन लढा सुरू असून, चिन्हाचा गैरवापर होऊ नये म्हणून ते गोठवण्याचा पर्याय मांडण्यात आल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाच्या कामकाजावरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत राजकीय पक्षांच्या नोंदणी आणि आर्थिक व्यवहारांची योग्य छाननी होते का, असा सवाल केला.https://maharashtramirror.com/ Mumbai News

जरांगे यांच्याशी सरकारने चर्चा करावी

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्याशी सरकारने थेट चर्चा करावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली. जाती-जातींमध्ये फूट पाडण्याऐवजी सर्व समाजघटकांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शिवसेनेकडून जनजागृती अभियान राबवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच उत्सवांच्या काळात जातीय तणाव निर्माण करणाऱ्या घटनांचा तपास करून त्यामागील सूत्रधार शोधण्याची मागणी त्यांनी केली.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना, हिंदुत्व केवळ घोषणांमध्ये किंवा दिखाव्यात नसून त्यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये आहेत, असे ठाकरे म्हणाले. “आपल्याला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही,” असे सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

शेअर करा