मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Tushar Ghadigaonkar : तुषार घाडीगावकरच्या आत्महत्येने मराठी रंगभूमी सुन्न

Tushar Ghadigaonkar News : काम नसल्याच्या नैराश्यातून अभिनेता तुषार घाडीगावकरचे टोकाचे पाऊल,‘लवंगी मिरची’ ते ‘सखा माझा पांडुरंग’ — छोट्या पण उठावदार भूमिका करणारा चेहरा हरपला

V
Vivek

1 मिनिट वाचन

Tushar Ghadigaonkar : तुषार घाडीगावकरच्या आत्महत्येने मराठी रंगभूमी सुन्न

 Tushar Ghadigaonkar News : काम नसल्याच्या नैराश्यातून अभिनेता तुषार घाडीगावकरचे टोकाचे पाऊल,‘लवंगी मिरची’ ते ‘सखा माझा पांडुरंग’ — छोट्या पण उठावदार भूमिका करणारा चेहरा हरपला

मुंबई | मराठी मालिकांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तरुण अभिनेता तुषार घाडीगावकर  Tushar Ghadigaonkar याने आत्महत्या केल्याची दु:खद घटना समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कामाच्या प्रतीक्षेत असलेल्या तुषारने मानसिक नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती समोर आली आहे. तो मुंबईतील भांडूप येथे वास्तव्यास होता.

सामान्य चेहऱ्यातून खास व्यक्तिमत्त्व जपणारा ‘घाड्या’ अर्थात तुषार, रुपारेल महाविद्यालयात अभिनयाची सुरुवात करताना कॉलेज रंगभूमीचा उजवा कोपरा ठरला होता. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'सखा माझा पांडुरंग' अशा मालिकांमध्ये त्याने छोट्या पण परिणामकारक भूमिका साकारल्या होत्या. 'भाऊबळी', 'झोंबिवली' अशा चित्रपटांमधूनही तो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला होता.

परंतु ग्लॅमरच्या जगामागची वास्तवाची किनार पुन्हा एकदा समोर आली आहे. सततच्या नकारात्मकतेतून, आर्थिक व मानसिक दबावातून हा अभिनेता गडबडलेल्या जगाला शेवटचा निरोप देऊन निघून गेला.

तुषार मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील होता. अभिनयाची गोडी शालेय जीवनातच लागलेली. अनेक मित्रांना हसवत, जगण्याचा संघर्ष तो खंबीरपणे करत राहिला, पण अलीकडच्या काळात कामाच्या अभावाने नैराश्याने त्याच्यावर ताबा मिळवला.

या घटनेनंतर संपूर्ण मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त होत असून, अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले आहे. कलाकारांच्या मानसिक आरोग्यविषयीच्या प्रश्नांवर पुन्हा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

शेअर करा