Mumbai news : अन्याय पाहत बसू नका, योग्य वेळी आवाज उठवा’: तुकाराम मुंढेंची पोस्ट चर्चेत
Mumbai news मुंबई : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या धडक कारवाईसाठी ओळखले जातात.
1 मिनिट वाचन

Mumbai News : द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगाचा दाखला देत नागरिकांच्या भूमिकेवर भाष्य; ‘बदलासाठी दुसऱ्याची वाट पाहू नका’
Mumbai news मुंबई : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या धडक कारवाईसाठी ओळखले जातात. मात्र, सध्या ते एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. समाजात अन्याय होत असताना केवळ प्रेक्षकाची भूमिका न घेता, योग्य वेळी आवाज उठवणे आणि कृती करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचा संदेश त्यांनी या पोस्टमधून दिला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news,
अन्यायाविरोधात भूमिका घेण्याचे महत्त्व स्पष्ट करताना मुंढे यांनी महाभारतातील हस्तिनापूरच्या दरबारातील द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगाचा दाखला दिला. हा प्रश्न केवळ दुर्योधनापुरता मर्यादित नव्हता, तर सभेत उपस्थित असलेल्या प्रत्येक प्रभावशाली व्यक्तीच्या भूमिकेशी संबंधित होता, असे त्यांनी नमूद केले.https://maharashtramirror.com/ Mumbai News
भीष्मांसारख्या व्यक्तीकडे मूल्यांची कमतरता नव्हती; मात्र निर्णायक क्षणी कृती करण्याची कमतरता होती, असा मुद्दा मुंढे यांनी मांडला. काळ बदलला असला, तरी अन्याय समोर घडत असताना त्याकडे पाहण्याची मानसिकता फारशी बदललेली नाही, असेही त्यांनी सूचित केले.https://maharashtramirror.com/ Mumbai news
‘बदल व्हायला हवा’ असे म्हणणारे अनेकजण असतात. मात्र, हा बदल घडवण्याची जबाबदारी स्वतः घेण्याऐवजी दुसऱ्याने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा केली जाते. याच मानसिकतेवर भाष्य करताना मुंढे यांनी ‘शिवाजी जन्माला यावा, पण शेजारच्या घरात’ या प्रचलित म्हणीचा दाखला दिला.
समाजात परिवर्तन घडवण्यासाठी एखाद्या महान व्यक्तीची प्रतीक्षा करण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार योग्य वेळी आवाज उठवणे गरजेचे आहे, असा संदेश त्यांनी दिला. महाभारत कोणत्याही चमत्कारामुळे नव्हे, तर कुरुक्षेत्रावरील संघर्षानंतर संपले, याची आठवण करून देत आजच्या समाजातही कोणीतरी चमत्कार करेल, अशी अपेक्षा न ठेवता प्रत्येकाने आपल्या वाट्याची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. तुकाराम मुंढे यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या असून, त्यांच्या भूमिकेवर नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.




