मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Today's Weather Update : मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा पावसाची रिमझिम

•Today's Weather forecast Update मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात येत्या काही तासात मुसळधार पावसाची शक्यता

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Weather Update : आज सकाळपासून मुंबईत पाऊस पडत आहे. दरम्यान, 21 ते 22 जूनपर्यंत काही भागात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

•Today's Weather forecast Update मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात येत्या काही तासात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई :- मोठ्या विश्रांतीनंतर मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. शनिवारी ( 24 ऑगस्ट) सकाळपासूनच मुंबईसह राज्यात पावसाचे रिमझिम चालू झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाचा रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट दिली आहे. Today's Weather Update मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात येत्या तीन, चार तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने कोकण, गोवा आणि घाट भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. येत्या तीन, चार दिवस सर्वच भागांत पावसाचा जोर कायम राहणार आहे.

हवामान विभागाने मुंबई आणि मुंबई परिसरातील भाग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत 24 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. Today's Weather Update पुणे, सातारा, सोलापूर, ठाणे, बीड, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. रायगड आणि रत्नागिरीत मात्र रेड अलर्ट दिला आहे.

हेही वाचा: मुंबई : बांद्रा येथील 'यति स्पा' मध्ये रंगतेय आंबट शौकीन महेफिल ? मुंबई पोलीस अनभिज्ञ !

हेही वाचा: Sunday Mega Block : रविवारी (25 ऑगस्ट) मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक,लोकल सेवेवर परिणाम होणार !

शेअर करा