मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Crime : टिटवाळ्यात स्वस्त घरांच्या नावाखाली 50 लाखांचा गंडा; 70 ते 80 गुंतवणूकदारांची फसवणूक, बिल्डर पती-पत्नी फरार!

Thane Crime :ठाणे, (टिटवाळा) :- टिटवाळा (पूर्व) परिसरात स्वस्त दरात घरे देण्याचे आमिष दाखवून तब्बल 70 ते 80 हून अधिक सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडून सुमारे 50 लाख रुपये उकळल्याचा एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

टिटवाळ्यात स्वस्त घरांच्या नावाखाली 50 लाखांचा गंडा; 70 ते 80 गुंतवणूकदारांची फसवणूक, बिल्डर पती-पत्नी फरार!
टिटवाळ्यात स्वस्त घरांच्या नावाखाली 50 लाखांचा गंडा; 70 ते 80 गुंतवणूकदारांची फसवणूक, बिल्डर पती-पत्नी फरार!

Thane Crime : रायगड कॉम्प्लेक्स आणि श्री समर्थ कृपा चाळ प्रकल्पाच्या नावाखाली फसवणूक; ठाणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल

Thane Crime :ठाणे, (टिटवाळा) :- टिटवाळा (पूर्व) परिसरात स्वस्त दरात घरे देण्याचे आमिष दाखवून तब्बल 70 ते 80 हून अधिक सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडून सुमारे 50 लाख रुपये उकळल्याचा एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'रायगड कॉम्प्लेक्स/चाळ' आणि 'श्री समर्थ कृपा चाळ' या गृहप्रकल्पांच्या माध्यमातून नागरिकांकडून लाखो रुपये उकळल्यानंतर निर्धारित वेळेत बांधकाम पूर्ण न करता आणि घरांचा ताबा न देता आरोपी पसार झाले आहेत. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाणे ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) पुढील तपास अत्यंत वेगाने सुरू आहे.https://maharashtramirror.com/ Thane News

नावे बदलून थाटली कार्यालये; 2015 पासून सुरू होता फसवणुकीचा जाळ

कमी किमतीत हक्काचे घर मिळेल या आशेने सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या आयुष्यभराची जमापुंजी या प्रकल्पांमध्ये गुंतवली होती. टिटवाळा येथील सर्व्हे क्रमांक 212/1/प, 212/1/डी आणि 234/22 या जमिनींवर आरोपी राजेंद्र वामन मोरे आणि लीना राजेंद्र मोरे यांनी हे बेकायदेशीर गृहप्रकल्प सुरू केले होते.

या प्रकल्पांतील घरांच्या विक्रीसाठी टिटवाळा पूर्वेकडील स्थानक रस्त्यावरील श्रीनगर कॉम्प्लेक्समध्ये 'महाराजा एंटरप्रायझेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स', 'ओम 786 एकता डेव्हलपर्स' व 'आरएनसी ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स' अशा आकर्षक नावांनी कार्यालये उघडण्यात आली होती. 2015 पासून आरोपींनी गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारले, मात्र बांधकामाचा पत्ता नव्हता आणि घरांचा ताबाही मिळाला नाही. शेवटी नागरिकांच्या पैशांचा अपहार करून आरोपी कार्यालये बंद करत आणि भाड्याचे घर सोडून पसार झाले.

कल्याण तालुका पोलिसांत गुन्हा नोंद; इतर पीडित नागरिकांना पोलिसांचे आवाहन

याप्रकरणी तक्रारदार चंद्रकांत गोविंद पवार यांच्या फिर्यादीवरून कल्याण तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 316(2), 3(5) सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापनांमधील) हितसंबंधांचे रक्षण अधिनियम (MPID) 1999 चे कलम 3 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या गृहप्रकल्पांमध्ये पैसे गुंतवून फसवणूक झालेल्या अन्य कोणत्याही नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने पुढे यावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी केले आहे. पीडित नागरिकांनी सर्व पावत्या, व्यवहार करारपत्रे घेऊन कोर्टनाका, ठाणे (पश्चिम) येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील आर्थिक गुन्हे शाखेशी किंवा ०२२-२५४१५०१५ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा