मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Police News : ठाणे पोलीस आयुक्तालयात "पोलीस स्मृतिदिन" मानवंदना!

• Police Memorial Day Celebrated In Thane "पोलीस स्मृतिदिनी"214 जवानांना पोलीस आयुक्तांनी अर्पण केली श्रद्धांजली, ठाणे पोलीस दलातील चार शहीद पोलिसांनाही पोलिसांकडून मानवंदना

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Police News : ठाणे पोलीस आयुक्तालयात "पोलीस स्मृतिदिन" मानवंदना!

• Police Memorial Day Celebrated In Thane "पोलीस स्मृतिदिनी"214 जवानांना पोलीस आयुक्तांनी अर्पण केली श्रद्धांजली, ठाणे पोलीस दलातील चार शहीद पोलिसांनाही पोलिसांकडून मानवंदना

ठाणे :- देशभरात आज पोलीस स्मृतीदिन म्हणून पोलिसांना मानवंदना दिली जाते. 1959 दरम्यान,लडाखमध्ये भारतीय सीमेवर चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भ्याड हल्ल्यात दहा पोलीस जवान शहीद झाले होते. तेव्हापासून देशभरात 21 ऑक्टोबर हा दिवस देशात आणि प्रत्येक राज्यात पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळला जातो.

ठाणे पोलिसांनी आज (21 ऑक्टोबर) स्वर्गीय निर्मल देवी चिंतामणी दिघे उद्यान, पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण कार्यालयाजवळ पोलीस स्मृतीदिन पाळण्यात आला. या कार्यक्रमात देशभरातील 214 शहीद पोलिसांना मानवंदना देण्यात आली आहे. तसेच ठाणे पोलीस दलातील चार शहीद जवानांनाही पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली आहे. भालचंद्र दत्तात्रय कर्डिले, रमेश यशवंतराव जगताप, बाळू सुखदेव गांगुर्डे, तुकाराम यशवंत कदम या पोलिसांना ठाणे पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली आहे.

पोलीस स्मृतीदिनी कार्यक्रमाकरिता भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, भुजंगराव मोहिते ( सेवानिवृत्त पोलीस आयुक्त, ठाणे), ज्ञानेश्वर चव्हाण, सह पोलीस आयुक्त, ठाणे व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अंमलदार, स्वातंत्र सेनानी, सामाजिक कार्य करणाऱ्या प्रतिष्ठीत व्यक्ती, जेष्ठ नागरीक, वृत्तपत्र प्रतिनिधी तसेच 4 शहिद पोलीस जवानांचे नातेवाईक उपस्थित होते.

हेही वाचा: अंबरनाथ : जीवे ठार मारायची धमकी, पोलीस आयुक्तांचे मोठी कारवाई शस्त्रासह दोन आरोपींना अटक

शेअर करा