मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Police News : पोलीस आयुक्तालय आता होणार 'सुजल'! आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते भव्य RO प्लांटचे उद्घाटन; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी

Thane Police Latest News : पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना मिळणार शुद्ध व थंड पाणी; पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून राबवला विशेष उपक्रम

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Police News : पोलीस आयुक्तालय आता होणार 'सुजल'! आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते भव्य RO प्लांटचे उद्घाटन; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी

Thane Police Latest News : पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना मिळणार शुद्ध व थंड पाणी; पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून राबवला विशेष उपक्रम

ठाणे :- ठाणे शहर पोलीस आयुक्तालय परिसरात कार्यरत असलेले हजारो पोलीस अधिकारी, अंमलदार आणि आपल्या तक्रारी घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. पोलीस आयुक्त कार्यालयातील पिण्याच्या पाण्याचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न आता कायमस्वरूपी सुटला असून, आज 9 मार्च 2026 रोजी आयुक्तालय परिसरात नूतन RO (Reverse Osmosis) प्लांटचे थाटात उद्घाटन करण्यात आले. Thane Police Latest News

पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून साकारलेला प्रकल्प

पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या विशेष संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. कार्यालयात दिवस-रात्र काम करणाऱ्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या अतिथीगणांपर्यंत सर्वांना शुद्ध आणि थंड पिण्याचे पाणी मिळावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या प्लांटमुळे आता उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पोलीस दलातील अनेक दिग्गज अधिकारी उपस्थित होते. यामध्ये ज्ञानेश्वर चव्हाण (पोलीस सह-आयुक्त), श्रीकांत पाठक (अपर पोलीस आयुक्त, प्रशासन), विनायक देशमुख (अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग),डॉ. श्रीकांत परोपकारी (पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय 1),डॉ. पवन बनसोड (पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय-2) या मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

शेअर करा