मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Dahi Handi 2025 : दहीहंडीच्या मंचावर आव्हाड आणि जाधव यांची 'यारी', 'जय जय महाराष्ट्र' गाण्यावर ठेका!

मनसेच्या दहीहंडीत जितेंद्र आव्हाडांची हजेरी, राज्यगीतावर नाचले गोविंदा, 'दहीहंडीची पंढरी आणि विठ्ठल जितेंद्र आव्हाड' अशी अविनाश जाधवांकडून स्तुती

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Dahi Handi 2025 : दहीहंडीच्या मंचावर आव्हाड आणि जाधव यांची 'यारी', 'जय जय महाराष्ट्र' गाण्यावर ठेका!

मनसेच्या दहीहंडीत जितेंद्र आव्हाडांची हजेरी, राज्यगीतावर नाचले गोविंदा, 'दहीहंडीची पंढरी आणि विठ्ठल जितेंद्र आव्हाड' अशी अविनाश जाधवांकडून स्तुती

ठाणे :- राजकारण बाजूला ठेवून मराठी सणांसाठी एकत्र आलेल्या मनसे अध्यक्ष अविनाश जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मैत्रीची चर्चा ठाण्यात चांगलीच रंगली आहे. मनसेच्या 'मराठी सणांसाठी, मराठी मनांसाठी' या ब्रीदवाक्याखाली आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी विशेष उपस्थिती लावली आणि 'जय जय महाराष्ट्र' हे राज्यगीत गात उपस्थितांचा उत्साह वाढवला.

यावेळी, मंचावर जितेंद्र आव्हाड येताच मनसेचे अविनाश पानसे यांनी त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, "आनंद दिघे यांनी या सणाला मोठे स्वरूप दिले आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी हा सण जगभरात पोहोचवला." त्यांनी स्पेनच्या गोविंदा पथकांना मुंबईत आणल्याचेही नमूद केले. या स्तुतीमुळे आव्हाड भारावून गेले. त्यांनी माईक हाती घेत डीजेला 'जय जय महाराष्ट्र' हे राज्यगीत लावण्यास सांगितले. "एकही हात खाली राहणार नाही," असे सांगत त्यांनी उपस्थितांना मराठी माणसाची ताकद दाखवण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आव्हाडांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. "आज जुने दिवस आठवले, पक्ष, जात, धर्म विसरून इथे गोविंदा पथक येतात. मी त्यांच्यासाठी आलो. अविनाशने बोलावलं म्हणून आलो. इथे आल्यावर राज्यगीत गाऊन फ्लॅशबॅकमध्ये गेलो," असे ते म्हणाले. दुसरीकडे अविनाश जाधवांनीही आव्हाडांचे तोंडभरून कौतुक केले. "ठाणे ही दहीहंडीची पंढरी आहे आणि या पंढरीचा विठ्ठल जितेंद्र आव्हाड आहे," अशा शब्दांत त्यांनी आव्हाडांबद्दल आदर व्यक्त केला.

हेही वाचा: Dahi Handi 2025 : दहीहंडीचा थरार! कोकण नगरच्या गोविंदांनी रचला 'दशका'चा थर, नवा विश्वविक्रम नावावर!

शेअर करा