मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Crime News : शिकलकर टोळीचा ‘40 घरफोडी’चा थरार संपला! ठाणे पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीने 4 सराईत गुन्हेगार जेरबंद

• ठाणे, पुणे, नवी मुंबई, कल्याण आणि भिवंडीत धुमाकूळ; महागड्या मोटारीसह 39 लाख 53 हजारांचे दागिने जप्त

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Crime News

• ठाणे, पुणे, नवी मुंबई, कल्याण आणि भिवंडीत धुमाकूळ; महागड्या मोटारीसह 39 लाख 53 हजारांचे दागिने जप्त

ठाणे :- ठाणे, पुणे, नवी मुंबई, कल्याण आणि भिवंडी शहरात बंद घरे लक्ष्य करून धुमाकूळ घालणाऱ्या 'शिकलकर टोळीला' ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने (Crime Branch) अटक केली आहे. या चौघांच्या अटकेमुळे ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील 40 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी त्यांच्याकडून महागड्या मोटारीसह 39 लाख 56 हजार रुपयांचे दागिने आणि मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्ह्यांची कबुली आणि टोळीची ओळख

कल्याणमधील एका घरफोडीच्या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण युनिटने सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर (24 वय), सोनुसिंग जितेंद्रसिंग जुन्नी (27 वय), सन्नी करतासिंग सरदार (27 वय) आणि अतुल खंंडाळे (24 वय) या चौघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी सर्व गुन्ह्यांची कबुली दिली.

पुणे कनेक्शन: विजयसिंग, सोनुसिंग आणि अतुल हे तिघे पुण्यातील हडपसर भागातील रहिवासी आहेत.

सर्वाधिक गुन्हे: यातील तिघांविरोधात यापूर्वीच पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांत एकूण 28 गुन्हे दाखल आहेत. एकटा विजयसिंग याच्याविरोधात सर्वाधिक 20 गुन्हे दाखल आहेत.

40 गुन्हे उघडकीस

या टोळीच्या अटकेमुळे ठाणे आणि नवी मुंबईतील घरफोडीच्या अनेक घटनांचा उलगडा झाला आहे. यामध्ये ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील डोबिवली, विष्णुनगर, नारपोली, मुंब्रा, कळवा, मानपाडा, कोळसेवाडी, मध्यवर्ती, शिवाजीनगर, बदलापूर, महात्मा फुले, विठ्ठलवाडी या पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच, नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रातील खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेही उघडकीस आणणे शक्य झाले.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी पार पाडली.

हेही वाचा: Ajit Pawar : ‘आता आपल्यालाच पांघरूण घालायचंय!’; अजित पवारांकडून भर सभेत राजकीय मिश्किलता आणि फटकेबाजी

शेअर करा