मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thackeray VS Shinde : “शिवसेना संपवण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांचं नामोनिशाणही राहणार नाही!” — उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर कडाडून हल्ला

• “भाजप भ्रष्टांचं मोकळं दालन झालंय, तुरुंगाबाहेरच सदस्य नोंदणी सुरू”

V
Vivek

2 मिनिट वाचन

Thackeray VS Shinde : “शिवसेना संपवण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांचं नामोनिशाणही राहणार नाही!” — उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर कडाडून हल्ला

• “भाजप भ्रष्टांचं मोकळं दालन झालंय, तुरुंगाबाहेरच सदस्य नोंदणी सुरू”

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा 59 वा वर्धापन दिन सायन येथील षण्मुखानंद सभागृहात जलशोभायुक्त वातावरणात पार पडला. मात्र, या सोहळ्यात केवळ उत्सवच नव्हता, तर तो ठरला भाजप आणि शिंदे गटाविरोधातील आक्रमक रणघोषाचा मंच. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रचंड आक्रमक भाषेत दोन्ही गटांवर टीका करत, आपल्या शैलीत इशारे दिले—"ठाकरेंना संपवायला निघालेल्यांचं नामोनिशाणही ठेवणार नाही!"

ठाकरे म्हणाले, “आमची शिवसेना 59 वर्षांची झाली तरी विचार, नेता, भगवा आणि दैवत एकच आहे. आणि आता महाराष्ट्राच्या मनात जे आहे, ते मी करणारच.” त्यांनी युतीसंदर्भात राज ठाकरे यांच्याशी सकारात्मक संकेतही दिले.

भाजपच्या भ्रष्टाचारावर सडकून टीका करताना, त्यांनी थेट तुरुंगाबाहेर सदस्य नोंदणी सुरू असल्याचा आरोप केला. “अतिरेकी मिळत नाहीत, ते भाजपात गेले का? जेलबाहेर स्टॉल टाकून सदस्य करत आहेत,” अशा शब्दांत त्यांनी भाजपवर घणाघाती वार केला.

“नीतेश राणेंवर बोचरी टीका; पेंग्विन, बदक, कोंबडीचा संदर्भ देत टोला”

नीतेश राणेंवर त्यांनी अतिशय बोचरी आणि विनोदी शैलीत टीका करत म्हणाले, “तुझी उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा… डोळे कोणाचे आहेत माहीत नाही!” अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या पार्श्वभूमीवरही प्रश्न उपस्थित केला.

मुंबईतील 3 हजार कोटींच्या टेंडर घोटाळ्यावरून ठाकरे संतापले. “आज भाजपचे कार्यकर्ते सतरंजीच्या खाली गेलेत, उपरे नाचत आहेत. स्वाभिमान असेल तर बाहेर या!” असा स्पष्ट संदेश त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.

राज ठाकरे यांच्यासोबत युती होणार का, या चर्चांवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “बातम्या सुरू आहेत… काय होणार, कसले होणार, होणार की नाही… कळेलच. पण जे कार्यकर्त्यांच्या आणि राज्याच्या मनात आहे, तेच मी करणार!” अशा सूचक शब्दांत त्यांनी युतीसंदर्भात सकारात्मकतेचा सूर लावला.

याच मुद्द्याला पुढे नेत ठाकरे म्हणाले, “मराठी माणसांची शक्ती एकवटू नये, म्हणून भाजपचे ‘मालकांचे नोकर’ हॉटेलांमध्ये भेटीगाठी घेत आहेत. त्यांना भीती वाटते—मुंबई पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर अदानीचे काय होणार?”

“आता प्रयत्न सुरू आहेत मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून. जे आज नालायकपणाने वर्धापन दिन साजरा करतात, ते शेठजींच्या नोकरांचेही नोकर आहेत,” अशा कडवट भाषेत ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जहरी हल्ला चढवला.

हेही वाचा: Eknath Shinde : 'मुंबई जिंकून भगव्याची हॅट्ट्रिक करूया' — शिंदेंचा निर्धार

शेअर करा