मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thackeray Vijay Melava : मराठीच्या मंचावर ठाकरे एकत्र? विजयी मेळाव्याची राजकीय चर्चा तेजीत!

Thackeray Brother Vijay Melava : विजयी मेळाव्याच्या पोस्टरवर राज ठाकरे; ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा झळकणार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thackeray Vijay Melava : मराठीच्या मंचावर ठाकरे एकत्र? विजयी मेळाव्याची राजकीय चर्चा तेजीत!

Thackeray Brother Vijay Melava : विजयी मेळाव्याच्या पोस्टरवर राज ठाकरे; ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा झळकणार

मुंबई | मुंबईमध्ये मराठी अस्मितेच्या मुद्यावरून आयोजित विजयी मेळाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. Thackeray Brother Vijay Melava उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने अधिकृत अकाउंटवर राज ठाकरे यांचा फोटो असलेले पोस्टर प्रसिद्ध झाल्याने, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या मेळाव्याला कोणत्याही पक्षाचा मेळावा म्हणता येणार नाही. व्यासपीठावर कोणताही पक्षाचा झेंडा, चिन्ह नसेल, केवळ मराठी भाषेसाठी एकत्र आलेले नेतृत्व असेच चित्र असेल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या माध्यमातून पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडची झलक दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही स्पष्ट केलं की, “या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हेच असतील. व्यासपीठावर फक्त प्रमुख नेतेच असतील. कोणताही राजकीय ढोलबाजा न करता, मराठीसाठी एकत्र येण्याचा हा प्रयत्न आहे.”

राज ठाकरे यांची व्यासपीठावर उपस्थिती ही राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात आहे. शिवसेनेच्या उद्धव गटासोबत राज ठाकरे यांची युती झाल्यास मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकांत भाजपला तगडं आव्हान मिळू शकते. त्यामुळे या एका ‘अपक्ष’ मेळाव्यातून निर्माण होणाऱ्या राजकीय संदेशाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा