मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thackeray Brother's : 18 वर्षांनी एकत्र ठाकरे बंधू!तृतीय भाषेच्या निर्णयावर यशस्वी लढा; सरकार माघारी, ठाकरे मंचावर ‘विजयी मेळावा’

• स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या आघाडीचा संकेत?

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vijayi Melava

•स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या आघाडीचा संकेत?

मुंबई | राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून तृतीय भाषा सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करत ठाकरे बंधूंनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा निर्णायक परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. सरकारने अखेर आपला निर्णय मागे घेतला असून, या विजयाच्या निमित्ताने आज ठाकरे बंधू — उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे — तब्बल 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र आले.

मराठी जनतेच्या दबावामुळे हा निर्णय मागे घ्यावा लागल्याचा दावा करत ठाकरे बंधूंनी "विजयी मेळावा" आयोजित केला आहे. हा मेळावा केवळ विजयानंद साजरा करणारा नसून, येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय समीकरणांचा प्रारंभ करणारा ठरू शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

कार्यक्रमाची सुरुवात बँडद्वारे सादर करण्यात आलेल्या "महाराष्ट्र राज्य गीत" ने झाली. उपस्थित सर्वांनी उभे राहून मानवंदना दिली. संपूर्ण वातावरणात मराठी अस्मितेचा अभिमान दरवळत होता.

मेळाव्याच्या आधी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या व्हीआयपी रूममध्ये दाखल झाले आणि दोघांमध्ये काही मिनिटे संवाद झाला. व्यासपीठावर केवळ दोन खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या – एक राजसत्तेचे आणि दुसरी विरोधी शक्तीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ठाकरे बंधूंसाठी. उपस्थितांमध्ये या दृश्याचे खास औत्सुक्य होते.

या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेतेही उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आणि इतर काही महत्त्वाचे नेते या मेळाव्याला हजर होते. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी नव्या आघाडीच्या भूमिकेची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: Sanjay Raut : “मराठी माणसाचा अपमान करणाऱ्यांनी माफी मागावी!” — संजय राऊत यांचा फडणवीस-शिंदेंना थेट इशारा

शेअर करा